शुटिंग ते थेट स्टेडियम; धनश्रीनं व्हिडिओतून सांगितली स्टोरी

Dhanashree Verma
Dhanashree VermaSakal
Updated on

आयपीएल 2022 स्पर्धेतील पुण्याच्या मैदानातील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने केनच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाला एकहाती पराभूत केले. यंदाच्या हंगामात राजस्थानकडून खेळणाऱ्या भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने सर्वोत्तम गोलंदाजीचा नजराणा पेश करत तीन विकेट्स घेतल्या. (IPL 2022 dhanashree verma shared first ipl mini vlog Goes Viral)

एका बाजुला मैदानात युजी हवा करत असताना दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आलीये. धनश्री तशी नेहमीच या ना त्या माधम्यातून चर्चेत राहताना दिसली आहे. यावेळी ती स्टेडियमवरील आपल्या अदाकारीने लक्षवेधी ठरली.

Dhanashree Verma
IPL 2022 : चहलचा फ्लाईंग किस, धनश्री खुदकन हसली (VIDEO)
Dhanashree Verma
प्रिन्सेस जास्मीन ते IPL अँकर; Kira Narayanan चा रंजक प्रवास

ही गोष्ट इथेच थांबली नाही. पुण्याच्या स्टेडियवर उपस्थिती लावून लक्षवेधी ठरलेल्या धनश्रीची आता आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे. युजवेंद्र चहल ज्या दिवशी पुण्याच्या मैदानात खेळत होता त्याच दिवशी धनश्रीचे शुटही होते. हे शुटिंग आटोपून ती मॅच बघायला स्टेडियवर पोहचली होती. ही कहाणी तिने सोशल मीडियावरुन मिनी व्लॉगच्या स्वरुपात शेअर केलीये. यासोबत तिने काही खास ओळीही लिहिल्यात. तिने लिहिलंय की, माझा पहिला मिनी व्लॉग. तुम्हाला आणखी असे व्हिडिओ पाहायला आवडेल का? या व्हिडिओमध्ये धनश्री कारमधून प्रवास करताना दिसते. या छोट्या क्लीपमध्ये युजवेंद्र चहलही दिसतोय. तिच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून लोक याला चांगली पसंती देत आहेत. त्यामुळे येत्या काही सामन्यात तिच्याकडून आणखी काहीतरी नव नश्चितच पाहायला मिळणार, याचे संकेतच मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()