VIDEO : डग आउटमधील गंभीरच्या तेवरनं चाहते क्लिन बोल्ड

Gautam Gambhir's reaction after LSG's win against CSK goes viral
Gautam Gambhir's reaction after LSG's win against CSK goes viral Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामातील सातव्या सामन्यात रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएल स्पर्धेतील गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि लखनौ सुपर जाएंट्स (LSG) यांच्यातील सामना मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवर रंगला होता. दोन्ही संघांनी धावांची बरसात केल्याचे पाहायला मिळाले.

शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात नव्या संघाने 6 विकेट्सनी बाजी मारली. या सामन्यातील विजयानंतर लखनौच्या डक आउटमधील माहोल बघण्याजोगा होता. यावेळी संघाचे मेंटॉर गौतम गंभीर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. आयुष बडोनी याने विजयी धाव घेतल्यानंतर गंभीरने डग आउटमध्ये आक्रमक शैलीत सेलिब्रेशन केल्याचे दिसून आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते गंभीरच्या या तेवरवर फिदा झाल्याचे दिसते.

Gautam Gambhir's reaction after LSG's win against CSK goes viral
MI नं उघडलं IPL चं दार; आज CSK कडून खेळताना 'नबंर वन' रेकॉर्ड

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आणि विद्यमान खासदार असलेल्या गंभीरचा जोश बघण्याजोगा होता. संघातील युवा खेळाडूंसोबत त्याने केलेल सेलिब्रेशन खूप बोलके आणि मनात घर करणारे असेच होते. गौतम गंभीर हा मैदानात नेहमी शांत आणि तटस्थ राहिला आहे. तो भार जोशात येऊन कधी सेलिब्रेशन केल्याचे आठवत नाही. पण CSK विरुद्धच्या विजयानंतर त्याच्यातील वेगळ रुप अनुभवायला मिळालं. त्यामुळेच त्याने ज्या अंदाजात सेलिब्रेशन केले ते लोकांना भावले आहे. सोशल मीडियावरील त्याच्या फोटोवर आणि व्हिडिओवर तुफान प्रतिक्रिया उमटत आहेत.

Gautam Gambhir's reaction after LSG's win against CSK goes viral
सेहवागनं 'ऑस्करमधील कानफटीचं' मीम्स शेयर करुन शिवम दुबेला झापलं

आयपीएलच्या 15 व्या हंगामात दोन नवे संघ पहिल्यांदाच मैदानात उतरले आहेत. सलामीच्या लढतीत लोकेश राहुलच्या लखनौ सुपर जाएंट्स संघाला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात आयुष बडोनीच्या अर्धशतकी खेळीनं सर्वांच लक्ष वेधलं होतं. यावेळीही गंभीर चर्चेत आला होता. सलामीच्या लढतीत अनुभवी क्रुणाल पांड्याला मागे ठेवत त्याने युवा आयुषला बढती दिली. या पठ्यानंत दमदार अर्धशत झळकावल्यावर गंभीरवर कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामात लखनौसाठी गंभीरची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, हेच पहिल्या दोन सामन्यातून दिसून आले आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात लखनौनं तगडी टीम बांधणी केली आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर चेन्नई विरुद्धच्या लढतीत संघाने दमदार कमबॅक केले असून पुढील सामन्यात संघ कशी कामगिरी करतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.