मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या हंगामाची सुरुवात 28 वर्षीय स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) दमदार अशीच राहिली. लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या लढतीत हार्दिक पांड्या कॅप्टन म्हणून पहिल्यांदाच मैदानात उतरला होता. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans ) दिमाखदार विजयही नोंदवला. या सामन्यावेळी हार्दिक पांड्याची पत्नी नताशाही (Natasa Stankovic) स्टेडियमवर उपस्थितीत होती.
पांड्याने या सामन्यात कॅप्टन्सीसह फलंदाजी आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही उपयुक्त कामगिरी करुन दाखवली. धावांचा पाठलाग करत असताना गुजरातच्या संघातील आघाडीचे दोन गडी अवघ्या 15 धावांत माघारी फिरले होते. संघ अडचणीत असताना मैदानात उतरलेल्या पांड्याने 28 चेंडूत 33 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. आपल्या या खेळीत त्याने 5 चौकार आणि एक षटकार खेचला. या सामन्यातील वैशिष्ट्ये म्हणजे लखनऊ कडून खेळणाऱ्या क्रुणाल पांड्यानं त्याची विकेट घेतली.
भावाने भावाची विकेट घेतल्यानंतर स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी उपस्थिीत राहिलेल्या हार्दिक पांड्याच्या पत्नीची रिअॅक्शनही कॅमेऱ्यात कैद झाली. सोशल मीडियावर नताशाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
हार्दिक पांड्याला बाद केल्यानंतर क्रुणाल शांतपणे एका वेगळ्या ढंगात सेलिब्रेशन करताना दिसले. दुसरीकडे हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टानकोविक (Natasa Stankovic) हिची झलकही बघण्याजोगी होती. हार्दिक पांड्याची विकेट पडली त्यावेळीच नाही तर गुजरातच्या संघाच्या विकेट्स पडत असताना नताशा आपल्या चेहऱ्यावरील नाराजी लपवू शकली नाही. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.