कोलकाता : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने चांगली सुरूवात केली. सलामीवीर जॉस बटलरने दमदार अर्धशतक पूर्ण करत संघाला 150 शतकी मजल मारून दिली होती. मात्र जॉस बटलरला हार्दिक पांड्याकडून एक जीवनदान मिळाले. अर्थात यात हार्दिकचा फारसा दोष नव्हता.
राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरने सावध सुरूवात केली. जॉस बटलर आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. मात्र साई किशोरने ही जोडी फोडली. त्याने 26 चेंडूत 47 धावा करणाऱ्या संजू सॅमसनला बाद केले. यानंतर जॉस बटलरने 15 व्या षटकापर्यंत सावध पवित्रा घेतला. त्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. मात्र 17 व्या षटकात यश दयालचा दुसरा चेंडू बटलरने हवेत मारला. लाँग ऑफला उभा असलेला हार्दिक हा झेल टिपण्यासाठी पुढे सरसावला मात्र त्याचा पाय घसरल्याने तो खाली पडला. अशा प्रकारे बटलरला जीवनदान मिळाले. त्यानंतर बटलरने चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले.
जॉस बटलरने 56 चेंडूत 89 धावांची खेळी करत राजस्थानला 188 धावांपर्यंत पोहचवले. जॉस बटलर आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. मात्र साई किशोरने ही जोडी फोडली. त्याने 26 चेंडूत 47 धावा करणाऱ्या संजू सॅमसनला बाद केले.
आक्रमक खेळणारा संजू बाद झाल्यावर सावध फलंदाजी करणाऱ्या जॉस बटलरने आपला गिअर बदलण्या सुरूवात केली. त्याने पडिक्कलला साथीला घेत राजस्थानला शतकी मजल मारून दिली. मात्र पडिक्कलने 20 चेंडूत 28 धावा करत बटलरची साथ सोडली. दरम्यान, बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले.
बटलरने अर्धशतकानंतर आपला दांडपट्टा सुरू केला. त्याने शेवटच्या 5 षटकात 60 पेक्षा जास्त धावा ठोकून काढल्या. दरम्यान, हेटमायर (4) आणि रियान पराग (4) हे स्वस्तात माघारी गेले. जॉस बटलरने 56 चेंडूत 89 धावांची खेळी करत संघाला 188 धावांपर्यंत पोहचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.