IPL 2022 : 'मॅकेनिक दिसतोस', गुजरात टायटन्सची जर्सीवर कमेंटचा पाऊस

Gujarat Titans Unveil  Their Jersey
Gujarat Titans Unveil Their Jersey esakal
Updated on

आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) येत्या 26 मार्चपासून सुरू होत आहेत. सर्व फ्रेंचायजी जय्यत तयारी करत आहेत. एक एक करून फ्रेंचायजी नव्या हंगामातील जर्सीचे अनावरण करत आहेत. यंदाच्या हंगामातील नवीन संघ गुजरात टायटन्सही (Gujarat Titans) आपल्या जर्सीचे अनावरण (Gujarat Titans Jersey) केले. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सप्रमाणे गुजरात टायटन्सने देखील आपल्या जर्सीसाठी निळाच रंग (Blue Jersey) निवडला आहे.

Gujarat Titans Unveil  Their Jersey
IPL 2022: हार्दिक पांड्याचा 'बॉम्ब एक्सपर्ट' अवतार

गुजरात टायटन्सच्या जर्सीचे अनावरण नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium in Ahmedabad) करण्यात आले. यावेळी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) देखील उपस्थित होता. संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हार्दिक पांड्याचा नव्या जर्सीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हार्दिक पांड्याबरोबरच या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) आणि संघाचा प्रशिक्षक आशिष नेहरा देखील उपस्थित होते.

Gujarat Titans Unveil  Their Jersey
IPL 2022 : विराट कोहलीने केली RCB च्या नव्या कॅप्टनची घोषणा

ज्यावेळी गुजरात टायटन्सने ट्विटवर हार्दिक पांड्याने घातलेल्या नव्या जर्सीचे फोटो टाकले त्यावर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस पडला. बरेच चाहते गुजरातने मुंबई (Mumbai Indians), दिल्ली प्रमाणे निळ्याच रंगाला प्राधान्य दिल्याने वैतागले होते. तर काही नेटकऱ्यांनी गुजरात टायटन्सच्या जर्सीचा नेव्ही ब्लू रंग हा मुंबई इंडियन्सच्या ब्राईट ब्लू रंगापेक्षा कसा वेगळा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. एका नेटकऱ्याने तर हार्दिकला गुजरात टायटन्सच्या निळ्या रंगाच्या जर्सीत पाहून तू एकमद मॅकेनिक सारखा दिसतोस अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.