VIDEO | RR vs LSG : लखनौ जिंकता जिंकता हरली; पाहा Highlights

IPL 2022 Lucknow Super Giants vs Rajasthan Royals
IPL 2022 Lucknow Super Giants vs Rajasthan Royals esakal
Updated on

कुलदीप सेनने शेवटच्या षटकात विजयासाठी 15 धावांची गरज असताना फक्त 11 धावा देत राजस्थानला विजय मिळवून दिला. पाहा सामन्याच्या हायलाईट्स

126-8 : युझीची चौथी शिकार

युझवेंद्र चलहने आपल्या शेवटच्या षटकात दुशमंथा चमीराला बाद करत लखनौला आठवा धक्का दिला.

102-7 : युझवेंद्रने उडवला क्रुणाल पांड्याचा त्रिफळा

101-6 : लखनौची आशा मावळली

सलामीला आलेला क्विंटन डिकॉक हा लखनौच्या बॅटिंगचे पतन होत असताना एका बाजूने टिकून होता. मात्र युझवेंद्र चहलने त्याला 39 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला.

74-5 : युवा स्टार आयुष बदोनीची केली चहरने शिकार

लखनौ सुपर जायंटचे एक पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात होते. डाव सावरण्याची जबाबदारी युवा आयुष बदोनीवर होती. मात्र युझवेंद्र चहलने त्याला 5 धावांवर बाद करत लखनौला 5 वा धक्का दिला.

52-4 : कुलदीप सेनने दीपक हुड्डाचा केला अडसर दूर

14-3 : प्रसिद्ध कृष्णाने दिला तिसरा धक्का

प्रसिद्ध कृष्णाने जेसन होल्डरला बाद करत लखनौ सुपर जायंटला तिसरा धक्का दिला. कृष्णाने होल्डरला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची रणनिती फोल ठरवली.

1-2 : बोल्टचे पहिल्याच षटकात दोन धक्के

डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने लखनौ सुपर जायंटला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का दिला. त्याने कर्णधार केएल राहुलच्या त्रिफळा उडवला. त्यानंतर एक चेंडू वाईड टाकला. मात्र त्याच्या पुढच्या चेंडूवर कृष्णाप्पा गौतमला पायचित पकडून लखनौची अवस्था 2 बाद 1 धाव अशी केली.

RR 165/6 (20) : हेटमायरच्या नाबाद 59 धावा, तर अश्विनने दिले 28 धावांचे योगदान

163-5 : रियान पराग एक षटकार मारून झाला बाद

हेटमायरची हिटिंग 

राजस्थानची अवस्था 4 बाद 67 झाली असताना शिमरोन हेटमायरने डाव सावरत 33 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यामुळे राजस्थान 150 च्या जवळ पोहचला.

67-4 : डुसेनचे येरे माझ्या मगाल्या

राजस्थानचा रिटेन प्लेअर यशस्वी जैसवालला बादूल

64-3 : सेट पडिकलची कृष्णाप्पा गौतमने केली शिकार

बटरल आणि सॅमसन बाद झाल्यानंतर राजस्थानच्या डावाची सर्व जबाबदारी सेट झालेल्या पडिक्कवर आली होती. मात्र कृष्णाप्पा गौतमने त्याला 29 धावांवर बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला.

60-2 : होल्डरने कॅप्टनला केले गार

जेसन होल्डरने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला 13 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.

42-1 : राजस्थानला मोठा धक्का

धडाकेबाज सलामीवीर जॉस बटलरला आवेश खानने 13 धावांवर बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला.

दोन्ही संघात दोन बदल

राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात दोन बदल केले असून रिटेन केलेल्या यशस्वी जैसवालला बाहेर बसवले आहे. त्याच्या जागी वॅन डेर डुसेनला संधी मिळाली आहे. तर नवदीप सैनीच्या जागी कुलदीप सेनला संधी मिळाली आहे.

लखनौ सुपर जायंटने देखील आपल्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी लुईस आणि टायच्या जागी स्टॉयनिस आणि चमिराला संधी दिली आहे.

लखनौ सुपर जायंटने नाणेफेक जिंकली

लखनौ सुपर जायंटने नाणेफेक जिंकून सर्वांप्रमाणेच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थानचा लखनौवर निसटता विजय 

मुंबई : आयपीएलच्या 20 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 3 धावांनी पराभव करत आपला तिसरा विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या षटकात विजयासाठी 15 धावांची गरज असताना राजस्थानच्या डेब्युटन कुलदीप सेनने टिच्चून मारा केला. राजस्थानने ठेवलेले 166 धावांचे आव्हान लखनौच्या बलाढ्य फलंदाजीला पेलवले नाही. त्यांना 20 षटकात 8 फलंदाजांच्या मोबदल्यात 162 धावांपर्यंतच मजल मरता आली. स्टॉयनिसने 17 चेंडूत 38 धावांची खेळी करत सामन्यात रंगत आणली मात्र लखनौचा विजय अवघ्या 3 धावानी दूर राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.