मुंबईचे ट्रॅफिक (Mumbai Traffic) हा कायमच चर्चेचा विषय असतो. मुंबईतील चाकमान्यांना रोजच ट्रॅफिक जामच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यावरून अनेकदा राजकीय आरोप प्रत्योरप देखील होत असतात. त्यातच आता आयपीएलचे (IPL 2022) जास्तीजास्त सामने हे मुंबईत होणार आहेत. त्यामुळे त्यांनाही सराव किंवा सामन्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅफिकचा सामना करावा लागण्याची शक्यता होती. मात्र महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) भारतीय क्रिकेट बोर्डाला (BCCI) आश्वासन दिले आहे की त्यांची आयपीएल ही मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फसणार नाही. कारण राज्य सरकार आयपीएलच्या संघांना हॉटेलपासून मैदानापर्यंत जाण्यासाठी एक विशेष मार्गाची सोय (Separate Road Corridor) करणार आहे.
येत्या 26 मार्चला वानखेडे स्टेडियमवर मुंबई - कोलकाता सामन्याने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरूवात होणार आहे. याचबरोबर ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम येथे आयपीएलचे साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. मुंबईत (Mumbai) 55 तर पुण्यात (Pune) 15 आयपीएल सामने खेळवण्यात येणार आहेत. याचबरोबर संघाना सरावासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संघाची हॉटेल्स सामन्याचे आणि सरावाचे ठिकाण यातील अंतर पाहता महाराष्ट्र सरकारने बीसीसीआय़ला संपूर्ण सहकाऱ्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आयपीएल संघांसाठी (IPL Teams) एक विशेष रोड कॉरिडोर देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) गव्हर्निंग काऊन्सिल मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांबरोबर शनिवारी बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) देखील उपस्थित होते. यानंतर इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नार्वेकर यांनी सांगितले की, 'आयपीएल महाराष्ट्रात आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार बीसीसीआयला सर्व सहकार्य करणार आहे. आयपीएल सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी देण्याबाबतचा अंतिम निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेतील.'
शनिवारी झालेल्या बैठकीत ठाकरेंनी बीसीसीआयचे अंतरिम सीईओ हेमंग अमिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी एमसीएचे काऊन्सील मेंबर अजिंक्य नाईक देखील उपस्थित होते. यावेळी बीसीसीआयला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे याची माहिती घेण्यात आली. अशी माहिती देखील मिळत आहे की महाराष्ट्र सरकार आयपीएल सामन्यावेळी मैदानात प्रेक्षकांच्या 25 टक्के उपस्थितीला परवानगी (Allow Crowds) देण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने दहा संघाच्या राहण्यासाठी दोन संघात एक फाईव्ह स्टार हॉटेल अशी सोय करण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.