आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक पाच जेतेपद पटकवणारा मुंबई इंडियन्सचा (MI) संघ सध्याच्या घडीला संघर्षाचा सामना करताना दिसतोय. संघाच्या सलग चार पराभवानंतर संघाच्या मालकीण नीता अंबानी (MI Owner Nita Ambani) यांनी थेट मुंबईच्या ताफ्यातील खेळाडूंना फोन केल्याचे पाहायला मिळाले. पराभवाने हताश झालेल्या खेळाडूंसह प्रशिक्षकांना प्रोत्साहन करण्यासाठी निता अंबानी यांनी खास फोन केला होता. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर नीता अंबानी यांनी कॉलच्या माध्यमातून खेळाडूंशी संवाद साधला. ड्रेसिंग रुममधील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी नीता अंबानींनी या कॉलच्या माध्यमातून खेळाडूंसह स्टाफ सदस्यांना संदेश दिला. नीता अंबानी म्हणाल्या की, मला तुमच्या सर्वांवर विश्वास आणि भरवसा आहे. आपण या वाईट दिवसांतून लवकर बाहेर पडू. सध्याच्या घडीला आपल्यावर जे संकट आले आहे याचा सामना याआधीही आपण केला आहे. आणि यश मिळवले आहे. उर्वरित सामन्यात त्याची आपल्याला पुनरावृत्ती करायची आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकजूट दाखवा. एकमेंकासोबत उभे राहा. एकमेकांना साथ द्या. आपण यातून मार्ग काढू. तुम्हाला जे हवं ते मिळेल. कृपया एकमेकांवर विश्वास ठेवा, अशा आशयाच्या शब्दांत नीता अंबानी यांनी संघाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.
रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ सातत्याने पराभवाला सामोरे जाताना दिसतोय. रोहित शर्मा धावा करण्यात अपयशी ठरतोय. कॅरेबियन स्टार पोलार्ड आणि मुंबईच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराह यांच्याकडूनही नावाला साजेसा खेळ होताना दिसत नाही. या त्रिकुटाच्या सुमार कामगिरीचा फटका संघाला बसताना दिसतोय. जर ही मंडळी लवकरात लवकर फॉर्ममध्ये आली नाहीत तर मुंबई इंडियन्सला प्ले ऑफ आधीच गाशा गुंडाळावा लागण्याची भीती आता निर्माण झाली आहे. याआधी मुंबई इंडियन्सने दमदार कमबॅक करुन ट्रॉफी जिंकून दाखवली आहे. अजूनही मुंबईच्या चाहत्यांसह मुंबई इंडियन्सच्या मालकीण बाईंना अशीच आस दिसते. संघ हा विश्वास पुढील सामन्यात सार्थ ठरवणार का? हे पाहणे रंजक असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.