Video MI vs DC : दिल्लीने पराभवाच्या दाढेतून खेचला विजय पाहा Highlights

IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live
IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals LiveSakal
Updated on

IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सने तगड्या मुंबईचा चार विकेट राखून पराभव केला. मुंबईने ठेवलेले 178 धावांचे आव्हान दिल्लीने 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 19 व्या षटकातच पार केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो जयंत यादव. त्याने दिल्लीचा डाव 6 बाद 104 धावांपासून सावरला. त्याने नाबाद 48 धावांची खेळी करत दिल्लीला विजयीपथावर नेले. त्याला 17 चेंडूत 38 धावांची खेळी करणारा अक्षर पटेलने मोलाची आणि आक्रमक साथ दिली. दिल्लीकडून कुलदीप यादवने देखील दमदार गोलंदाजी करत मुंबईचे 3 विकेट घेतल्या. तर मुंबईकडून इशान किशनने एकाकी झुंज देत 48 चेंडूत 81 धावा चोपल्या होत्या.

मुंबई जिंकता जिंकता कशी हरली पाहा हायलाईट्स

179-6 : जयंत यावद आणि अक्षर पटेलची तुफान फटकेबाजी; दिल्लीने विजय खेचून आणला.

जयंत यादव आणि अक्षर पटेलने तुफान फटकेबाजी करत दिल्ली कॅपिटल्सला पराभवाच्या दाढेतून बाहेर काढले. यादवने 48 तर अक्षर पटेलने 38 धावांची नाबाद खेळी केली. त्यांनी फटकेबाजी करत सामना 19 व्या षटकात संपवला.

104-6 : बेसल थंप्मीने लॉर्ड शार्दुलच्या आक्रमक खेळीला घातले वेसन

बेसल थंम्पीने आपला प्रभावी मारा सुरूच ठेवत दिल्लीची जमू पाहणारी जोडी फोडली. त्याने शार्दुल ठाकूरची 11 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने केलेली 22 धावांची खेळी संपवली. दिल्लीला शतक पार केल्यानंतर सहावा धक्का दिला.

लॉर्ड शार्दुलची फटकेबाजी; दिल्लीचे शतक झाले पार

72-5: बेसल थंपीने दिल्लीला एकाच षटकात आणले अडचणीत

10 वे षटक टाकणाऱ्या बेसल थम्पीने आधीच खोलात पाय असलेल्या दिल्लीला अजून खोलात नेले. त्याने या षटकात सेट झालेल्या पृथ्वी शॉला (38) आणि रोव्हमन पॉवलेला (0) बाद केले.

32-3 : टायमल मिल्सने दिल्लीचे 'दिल' असलेल्या ऋषभ पंतची शिकार केली.

मुर्गनने दिल्लीची अवस्था बिकट केली असतानाचा मिल्सने ऋषभ पंतला 1 धावेवर बाद करत दिल्लीला तिसरा आणि मोठा धक्का दिला.

30-2 : मुर्गन अश्निनचे दिल्लीला एकाच षटकात दोन धक्के

मुंबईचा लेग स्पिनर मुर्गन अश्विनने दिल्लीची सलामीची जोडी फोडली. त्याने टीम सैफर्टला 22 धावांवर बाद केले. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुर्गनने मनदीप सिंगला 'भोपळा' देऊन माघारी धाडले. त्यामुळे दिल्लीची अवस्था बिनबाद 30 वरून 2 बाद 30 अशी झाली.

177-5: इशान किशनची तडाखेबाज खेळीमुळे मुंबईच्या 20 षटकात 5 बाद 177 धावा

  • मुंबईचा सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज फलंदाजी करत मुंबईला 177 धावांपर्यंत पोहचवले. इशान किशनने 48 चेंडूत नाबाद 81 धावा ठोकल्या. त्याने आपली ही खेळी 11 चौकार आणि 2 षटकारांनी सजवली.

इशान किशनची दमदार खेळी, अर्धशतक ठोकत मुंबईला एकहाती सावरले.

  • रोहित शर्मा, कायरल पोलार्ड हे दोन तगडे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पोहचले असताना इशान किशानने मुंबई इंडियन्सचा डाव एकहाती सावरला. त्याने मुंबईला धडाकेबाज फलंजाजी करत 150 च्या पार पोहचवले.

159-5 : मुंबईचा निम्मा संघ माघारी

  • डावखुरा वेगावान गोलंदाज खलील अहमदने टीम डेव्हिडला 12 धावांवर बाद करत मुंबईला पाचवा धक्का दिला.

122-4 : कुलदीप यादव ऑन फायर; आधी रोहित आता पोलार्डची केली शिकार

कुलदीप यादवने मुंबईच्या दोन तगड्या फलंदाजांना बाद केले. पहिल्यांदा रोहितला 41 धावात रोखले. त्यानंतर पोलार्डला अवघ्या 3 धावात आपला बस्तारा गुंडाळायला लावला.

117-3 : तिलक वर्मा 22 धावा करून बाद, मुंबईला तिसरा धक्का

कुलदीप यादवने मुंबईला दिला मोठा धक्का, रोहित शर्मासह अनमोलप्रीतचीही केली शिकार

  • मुंबई इंडियन्सला दमदार सुरूवात करून देणाऱ्या रोहित शर्माला 41 धावांवर बाद करत कुलदीप यादवने मुंबईला पहिला धक्का दिला. रोहित बाद झाल्यानंतर आलेल्या अनमोलप्रीत सिंगला देखील कुलदीपने 8 धावांवर माघारी धाडले.

रोहित शर्मानं संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली, पहिल्याच षटकात मारला उत्तुंग षटकार

अपेक्षेप्रमाणं इशान किशनच्या साथीनं रोहित मुंबईच्या डावाला केली सुरुवात

असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ (Mumbai Indians Playing 11)

  • रोहित शर्मा (Rohit Sharma), इशान किशन (Ishan Kishan), अनमोलप्रित सिंग (Anmolpreet Singh), तिलक वर्मा (Tilak Varma), केरॉन पोलार्ड (Kieron Pollard), टीम डेविड (Tim David), डॅनियल सॅम्स (Daniel Sams), मुर्गन अश्विन (Murugan Ashwin), टायमल मिल्स ( Tymal Mills), जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah), बासिल

  • असा आहे दिल्लीचा संघ (Delhi Capitals Playing 11)

    पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), टीम सिफर्ट (Tim Seifert), मनदीप सिंग (Mandeep Singh), रिषभ पंत (Rishabh Pant), रावमन पॉवेल (Rovman Powell), ललित यादव (Lalit Yadav), अक्षर पटेल (Axar Patel), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), खलील अहमद (Khaleel Ahmed), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), कमलेश नागरकोटी (Kamlesh Nagarkoti)

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()