DK ला वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात जागा मिळेल?

IPL 2022 RCB vs RR Dinesh Karthik
IPL 2022 RCB vs RR Dinesh Karthik Sakal
Updated on

भारतीय संघाचा अनुभवी क्रिकेटर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या आपल्या अखेरच्या टप्प्यात आहे. टीम इंडियात (Team India) स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय सामना खेळून निवृत्ती घेणं हे कोणत्याही खेळाडूसाठी अवस्मरणीय क्षण असतो. हा क्षण दिनेश कार्तिकला अनुभवायला मिळणार का? हा येणारा काळच ठरवेल. पण सध्या दिनेश कार्तिक दमदार कामगिरी करताना दिसतोय. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 23 चेंडूत 44 धावांची मॅच विनिंग खेळी करत आपल्या भात्यात अजूनही मॅच विनिंग फटके खेळण्याची क्षमता असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. जर त्याने यंदाच्या हंगामात आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले तर ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याला संघात स्थान मिळू शकते.

IPL 2022 RCB vs RR Dinesh Karthik
VIDEO| RR vs RCB : आरसीबीमध्ये 'कार्तिकायन', पाहा Highlights

राजस्थान विरुद्ध 23 चेंडूत 44 धावांची मॅच विनिंग खेळी केल्यानंतर कार्तिक म्हणाला की, स्वत:ला न्याय देण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. मागील काही वर्षांत मी चांगली कामगिरी करु शकत होते. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत दिनेश कार्तिक टीम इंडियाचा सदस्य होता. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाला. या सामन्यानंतर त्याला संघात स्थान मिळालेले नाही.

IPL 2022 RCB vs RR Dinesh Karthik
VIDEO : चहलने घेतला बदला; पत्नीचा स्टँडमधून दंगा

मागील दोन वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीकडून त्याने आपल्या फलंदाजीत क्षमता दाखवून दिली आहे. 18 वर्षानंतर निदास ट्रॉफीच्या फायनलमधील 8 चेंडूत 29 धावांच्या नाबाद खेळीसह निवृत्ती घेण्यापेक्षा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत संघासाठी योगदान देण्याची संधी त्याच्यासाठी खूप मोठी असेल. यासाठी तो प्रयत्नशीलही दिसतो.

तामिळनाडूच्या विकेट किपर बॅटरन आपल्या फलंदाजीत काही तांत्रिक बदलही केले आहेत. यासंदर्भात तो म्हणाला की, ‘मी एका वेगळ्या पद्धतीने सराव करत आहे. माझी इनिंग अजून संपलेली नाही. माझ एक लक्ष्य आहे ते मला प्राप्त करायचे आहे. कार्तिकच लक्ष्य हे दुसरं तिसर कोणतही नसून पुन्हा टीम इंडियासाठी प्रतिनिधीत्व करण्याचे आहे. ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्ड कपही त्याला खुणावतोय. जर त्याने RCB कडून दमदार कामगिरी केली तर त्याला एक शेवटची संधी मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.