इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या 15 व्या हंगामाला 26 मार्च पासून सुरुवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यातील लढतीनं स्पर्धेचा शुभारंभ होईल. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 10 संघ खेळताना दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करणाऱ्या खेळाडूंच्या खांद्यावर प्रत्येक फ्रेंचायझींनी नेतृत्वाची धूरा सोपवली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)षटकार मारणार की धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज त्यांची बरोबरी करणार? या प्रश्नासह नवा गडी नव राज्य हे समीकरण पाहायला मिळणार का? याच उत्तर मे मध्येच मिळणार आहेय आयपीएलमधील (IPL 2022) 10 संघातील सर्व कर्णधारांच्या कमाईची खेळाप्रमाणे आणि नावाप्रमाणे दमदार आहे. जाणून घेऊयात कोणत्या कर्णधाराला किती रुपये मिळतात यावर एक नजर...
1. मयंक अग्रवाल- 12 कोटी रुपयांत पंजाब किंग्जने रिटेन केलेल्या मयंक अग्रवालची एकूण वार्षिक कमाई जवळपास 26 कोटीच्या घरात आहे. आयपीएलमधील कॅप्टन्सीशिवाय बीसीसीआयसोबतही तो करारबद्ध आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न आणि अनेक ब्रँडकडून तो कमाई करतो.
2. रिषभ पंत- दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधाराला आयपीएलमध्ये 16 कोटी मिळतात. क्रिकेट जगतात अल्प काळात भारतीय संघाचा सदस्य झालेल्या पंतचे एकूण उत्पन्न जवळपास 36 कोटीच्या घरात आहे.
3. हार्दिक पांड्या- गुजरात टायटन्स या नव्या टीमच्या नेतृत्वाची धूरा सांभाळणारा हार्दिक पांड्या हा क्रिकेट वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. त्याचे एकूण उत्पन्न 37 कोटीच्या घरात आहे. हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे.
4. संजू सॅमसन- राजस्था रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची कमाई 52 कोटीच्या घरात आहे. राजस्थानने संजूसाठी 14 कोटी मोजले असून MRF, SG सोबतही तो जोडला गेला आहे.
5. श्रेयस अय्यर- कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर अय्यरवर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आलीये. युवा वर्गात लोकप्रिय असलेल्या अय्यरची वार्षिक कमाई 53 कोटीच्या घरात आहे. श्रेयस गूगल, जिलेट, बोट सह अन्य अनेक ब्रँडशी करारबद्ध आहे.
6. केन विलियमसन- सनरायजर्स हैदराबादचा कर्णधाराला आयपीएलमधून 14 कोटी मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करणाऱ्या केनचे उत्पन्न हे 58 कोटीच्या घरात आहे.
7. केएल राहुल : पंजाब किंग्जची साथ सोडल्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार झालेल्या के एल राहुलनं स्टायलिस्ट क्रिकेटर अशी ओळख निर्माण केलीये. बीसीसीआयसोबतच्या वार्षिक करारातून त्याला 5 कोटी मिळतात. नव्या लखनऊ फ्रेंचायझीने यंदाच्या आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी त्याच्यासाठी 17 कोटी मोजले होते. तो सर्वात महागडा कर्णधारही ठरलाय. त्याचे एकूण उत्पन्न जवळपास 75 कोटींच्या घरात आहे.
8. फाफ डु प्लेसिस: विराट कोहलीच्या जागेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची जबाबदारी खांद्यावर पडलेला फाफ ड्युप्लेसी परदेशी कॅप्टनपैकी एक आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न 102 कोटींच्या घरात आहे. आरसीबीकडून त्याला 7 कोटी मिळाले आहेत. आफ्रिकी क्रिकेट बोर्डाकडून त्याला 3 कोटी मिळतात. तो इतर व्यावसायिक क्रिकेटमधूनही कमाई करतो.
9. रोहित शर्मा : भारतीय क्रिकेट टीमचा आणि मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा सर्वात श्रीमंत क्रिकेटपैकी एक आहे. बीसीसीआयच्या ग्रेड ए प्लस वर्गवरीत त्याची वर्णी लागते. मुंबई इंडियन्सकडून 16 कोटी मिळणाऱ्या रक्कमेसह अन्य ब्रँडशी कनेक्ट असल्यामुळे तो जवळपास 180 घरात कमाई करतो.
10. एमएस धोनी : क्रिकेट जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत असलेल्या धोनीची कमाई थक्क करणारी आहे. काही रिपोर्ट्सनुसार धोनीची कमाई 800 कोटीहूनही अधिक आहे. यावेळी चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यासाठी 12 कोटी मोजले आहेत. धोनी हा काही कंपन्यांचा मालक असून अनेक कंपनीमध्ये सहभागीदारही आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.