वॉशिंग्टनची 'सुंदर' बॅटिंग; पण 'सुर्यवंशम' मीम्स का होतेय व्हायरल?

Washington Sundar
Washington SundarSakal
Updated on

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामात पुण्यातील मैदानातील (Pune Cricket Stadium) सलामीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सनं केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) पराभूत केले. या सामन्यानंतर सोशल मीडियावर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) चांगलाच चर्चेत आलाय. हैदराबादने सामना जिंकला नसला तरी त्यांच्याकडून खेळणाऱ्या युवा भारतीय फिरकीपटूनं आपल्या भात्यातील फटकेबाजीन सर्वांची मनं जिंकली आहेत. राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) दिलेल्या 210 धावांच्या डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदरने अप्रतिम खेळी केली. (ipl 2022 srh vs rr Washington Sundar played beautifully knock of 40 netizens troll rcb)

Washington Sundar
VIDEO : केनवरील प्रेमापोटी अंपायरवर बरसले नेटकरी!

आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर पाटा खेळपट्टीवर कशी फटकेबाजी करायची याचा नमुना त्याने दाखवून दिला. वॉशिंग्टन सुंदरन 14 चेंडूत 40 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार खेचत त्याने 285.71 च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या. त्याची ही खेळी पाहून नेटकरी भलतेच खूश झाले. सोशल मीडियावर त्याच्या खेळीचे कौतुक होत आहे.

Washington Sundar
SRH vs RR : वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी; राजस्थानची अतिसुंदर व्हिक्टरी!

वॉशिंग्टन सुंदरच्या खेळीनं RCB ट्रोल

वॉशिंग्टन सुंदरच्या दमदार फलंदाजीचं कौतुक करताना काही नेटकरी आरसीबीची फिरकी घेत आहेत. एका नेटकऱ्याने तर सुर्यवंशम चित्रपटातील शिवाजी साटम आणि बिंदू यांच्यातील एक इमोशनल सीनच्या मीम्समधून आरसीबीच्या भावना काय असतील हे सांगण्याचा प्रयत्न केलाय.

यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं वाशिंग्टन सुंदर आणि देवदत्त पडिक्कल या दोन युवांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. पुण्याच्या मैदानात दोघांनी तुफानी खेळी केली. राजस्थानकडून देवदत्त पडिक्कल तर हैदराबादकडून वाशिंग्टन सुंदरने लक्षवेधी खेळ केला. त्यामुळेच आरसीबीला त्यांना सोडल्याचा पश्चाताप होत असेल, असा तर्क नेटकरी लावत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.