पुणे : चेन्नईचा कर्णधार बदलला अन् संघ विजयी ट्रॅकवर परतला. चेन्नई सुपर किंग्जने सनराईजर्स हैदराबादचा 13 धावांनी पराभव करत हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला. सीएसकेचे 203 धावांचे आव्हान हैदराबादला पेलवले नाही. त्यांना 20 षटकात 6 बाद 189 धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादकडून निकोलस पूरनने आक्रमक फलंदाजी करत 64 धावा केल्या. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 4 बळी टिपले. तर फलंदाजीत ऋतुराज गायकवाडने 99 तर डेव्हॉन कॉनवॉयने 85 धावा केल्या.
18 व्या षटकात सीएसकेने आपले दीडशतक पार केले होते. मात्र मुकेश चौधरीने शशांक सिंहला 15 धावांवर बाद करत हैदराबादला पाचवा धक्का दिला.
सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन चेन्नईच्या 202 धावांचा पाठलाग करताना दमदार फलंदाजी करत होता. मात्र प्रेटोरियसने त्याची ही 37 चेंडूत केलेली 47 धावांची खेळी 15 व्या षटकात संपवली.
चेन्नईने 203 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी दमदार सुरूवात केली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र त्यानंतर मुकेश चौधरीने हैदराबादला पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने अभिषेक शर्माला 39 धावांवर तर राहुल त्रिपाठीला शुन्यावर बाद केले.
चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने दमदार शतक ठोकणार असे वाटत असतानाच टी नटराजनच्या चेंडूवर 99 धावांवर झेलबाद केले.
आजच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या डेव्हॉन कॉनवॉयने सावध फलंदाजी करत अर्धशतक ठोकले.
ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवॉय यांनी सीएसकेला दमदार सुरूवात केली. या दोघांनी 11 व्या षटकात सीएसकेचे शतक धावफलकावर लावले.
चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्होन कॉनवॉयने संघाला आश्वास सुरूवात केली. त्यांनी सीएसकेला पॉवर प्लेमध्ये 40 धावांपर्यंत मजल मारून दिली.
कर्णधार बदल्यानंतर चेन्नईने संघात देखील बदल केले आहे. चेन्नईने ब्राव्हो आणि शिवम दुबेला वगळून डेव्हॉन आणि समरजीत सिंह यांना संधी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.