IPL 2022: अखेर ठरलं! सामने मुंबई-पुण्यातच, मात्र...

IPL 2022
IPL 2022Esakal
Updated on

मुंबई: आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) हा एकाच राज्यात खेळवण्याचा मानस बीसीसीआयने बोलून दाखवला होता. त्याप्रमाणे आयपीएलचे साखळी सामने महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai) आणि पुण्यातच (Pune) होणार आहेत. मात्र सामन्यांच्या वाटपात मुंबईने बाजी मारली असून तब्बल 55 सामने मुंबईत तर 15 सामने पुण्यात होणार आहेत. याबाबतची माहिती क्रिकबझ या वेबसाईटने दिली आहे. (IPL 2022 Venue Finalized)

क्रिकबझ या वेबसाईटने दिसेल्या माहितीनुसार आयपीएल 2022 चे लीग स्टेजमधील सामने हे चार मैदानांवर खेळवले जाण्याची शक्यता आहे. यात मुंबईत खेळवले जाणारे 55 सामने वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), ब्रेबॉर्न स्टेडियम (Brabourne) आणि डीवाय पाटील स्टेडियम (DY Patil Stadium) तीन मैदानावर होतील. तर पुण्यातील 15 सामने एमसीएच्या मैदानावर (MCA International Stadium) खेळवले जातील. आयपीएलमधील प्रत्येक संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी 4 सामने खेळेल. तर पुण्याच्या आणि ब्रेबॉनच्या स्टेडियमवर प्रत्येकी 3 सामने खेळेल. प्ले ऑफचे (Play Off) सामने कोठे खेळवायचे याचा निर्णय अजून झालेला नाही.

आयपीएलची सुरूवात मार्च 26 किंवा 27 ला होण्याची शक्यता आहे. तर आयपीएलची सांगता 29 मे रोजी करण्यात येण्याची शक्यात असल्याचे क्रिकबझचे म्हणणे आहे. याबाबतचा अंतिम निर्णय हा आयपीएल गव्हर्निंग काऊन्सीलच्या 24 फेब्रुवारीच्या बैठकीत घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.