भारताच्या जावयाला कोहलीनं दिला बॅक मसाज; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli And Glenn Maxwell
Virat Kohli And Glenn MaxwellSakal
Updated on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएलच्या हंगामात दोन सामन्यात अपराजित राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) ला पराभूत केले. वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात (Wankhede Stadium in Mumbai) मध्यफळीतील फलंदाजांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हा सामना सुरु असताना RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये एक अनोखा नजराणा पाहायला मिळाला. संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला बॅक मसाज देताना दिसून आले. ड्रेसिंगरुममध्ये हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

Virat Kohli And Glenn Maxwell
VIDEO: RCB फॅन कार्तिकला 'टॉपर' तर कोहलीला 'बॅक बेंचर' का म्हणत आहेत?

रॉयल चॅलेंजर्सच्या डावातील 15 व्या षटकात दिनेश कार्तिक मैदानात खेळत होता. त्याने खणखणीत चौकार मारल्यानंतर कॅमेरा RCB च्या ड्रेसिंग रुमच्या दिशेनं फिरला. यावेळी ड्रेसिंग रुममधील वातावरण आनंददायी दिसले. कोहली आपला सहकारी मॅक्सवेलला मसाज देत होता. या व्हिडिओत कॅप्टन फाफ ड्युप्लेसीसही (Faf du Plessis) ही रिलॅक्स मूडमध्ये दिसला.

Virat Kohli And Glenn Maxwell
किती गोड! रितिकाच्या कवेत डेल्फी; समायरा काढतेय फोटो

आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ज्या खेळाडूंना रिटेन केले होते त्यात विराट कोहलीसह ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचा समावेश आहे. राजस्थानसह स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्याला तो संघाचा भाग नव्हता. मागच्याच महिन्यात त्याने भारतीय वंशाच्या विनी रमण नावाच्या गर्लफ्रेंडसोबत विवाह थाटला. त्यामुळे तो पाकिस्तान दौऱ्यालाही ऑस्ट्रेलियन संघासोबत गेला नव्हता. ख्रिस्ती आणि तमिळ पद्धतीनुसार विवाह सोहळा आटोपल्यानंतर आता मॅक्सवेल संघाला जॉईन झाला आहे. तो संघात सामील झाला असला तरी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या कराराणुळे 5 एप्रिलच्या आधी त्याला प्लेइंग इलेव्हनसाठी उपलब्ध राहता येणार नव्हते. त्यामुळेच क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतरही त्याला बाकावर बसावे लागले होते.

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्याला युजवेंद्र चहलने 5 धावांवर रन आउट केले. यंदाच्या हंगामात पंजाब विरुद्धच्या सामन्यात विराटने 29 चेंडूत 41 धावांची खेळी केली होती. त्यानंतर पुढच्या दोन सामन्यात त्याला केवळ 17 धावा करता आल्या आहेत. 9 एप्रिलला RCB चा संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध पुण्याच्या मैदानात भिडताना दिसेल. या सामन्यात मॅक्सवेलह सिलेक्शनसाठी उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.