इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामातील हाय स्कोअरिंग मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings Lucknow ) पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघांनी धावांची बरसात करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाला. सामना कधी लखनौ सुपर जाएंट्सच्या (Lucknow Super Giants) बाजूनं झुकताना दिसला तर कधी चेन्नई सुपर किंग्जनं पुन्हा कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. शेवटी बाजी मारली ती लखनौ सुपर जाएंट्सच्या संघानेच.
या सामन्याला खरी कलाटणी मिळाली ती 19 व्या षटकात. चेन्नई सुपर किंग्जनं निर्णायक ओव्हर टाकण्याची जबाबदारी ही शिवम दुबेवर सोपवली. सामन्यात पहिलेच षटक टाकताना तो दबावात दिसला. पहिल्याच चेंडूवर मारलेल्या षटकारातून तो सावरलाच नाही. आणि याच षटकात सामना लखनौच्या बाजूनं फिरला. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 211 धावांचे टार्गेट सेट केले होते. 4 विकेट गमावत लखनौ सुपर जाएंट्सने (LSG) हे लक्ष्य पार केले. या सामन्यात सर्वच गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाल्याचे पाहायला मिळाले. शिवम दुबेनं (Shivam Dube) 19 व्या षटकात 25 धावा खर्च केल्या.
शिवम दुबेच्या धुलाईवर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने मजेशीर ट्विट केले आहे. त्याने हॉलीवूड अभिनेता विल स्मिथने ऑस्कर पुरस्कारावेळी ख्रिस रॉकला मारलेल्या थप्पडची मीम्स शेअर केलीये. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार समारंभात पत्नीविषयी अशोभनिय वक्तव्य केल्यामुळे होस्टला चापड लगावली होती. या मीम्सच्या माध्यमातून सेहवागने शिवम दुबेची शाळा घेतलीये. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.