इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 20 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) संघाने लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) संघाला 3 धावांनी पराभूत केले. या विजयासह संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने चौथ्या सामन्यात तिसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयासह राजस्थानने पाँइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानावर कब्जा केलाय. राजस्थानच्या या विजयात कुलदीप सेन (Kuldeep Sen) याने पदार्पणाच्या सामन्यात रॉयल गोलंदाजी केली. त्याने शेवटच्या षटकात मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) सारख्या स्फोटक फलंदाजाला रोखून दाखवलं.
शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात राजस्थानच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो कुलदीप सेन. () आयपीएलमध्ये पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कुलदीप सेन याने आंतरराष्ट्रीय सामन्यातील मोठं नाव असलेल्या आणि आपल्या फटकेबाजीनं सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेलेल्या मार्कस स्टॉयनिसला रोखून दाखवलं. लखनऊ जाएंट्सच्या संघाला अखेरच्या षटकात 15 धावांची गरज होती. स्टॉयनिस असल्यामुळे सामना लखनऊ जिंकेल, असे वाटत होते. पण पदार्पणाच्या सामन्यात कुलदीप सेनने त्याच्यासमोर कमालीची गोलंदाजी करुन दाखवली. या अखेरच्या षटकात कुलदीप सेन याने पहिल्या चार चेंडूत केवळ एक धाव दिली. आणि सामना राजस्थानच्या बाजूनं झुकला.
उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या कुलदीप सेन याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात चार षटकात 35 धावा खर्च करुन एक विकेट घेतली. दीपक हुड्डाला त्याने 25 धावांवर बोल्ड केले. या विकेटपेक्षा त्याने महत्त्वाच्या क्षणी कमालीची गोलंदाजी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
कोण आहे कुलदीप सेन? (Who is Kuldeep Sen)
आयपीएलच्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने कुलदीप सेनला 20 लाख या मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं होते. 25 वर्षीय कुलदीप सेनचा जन्म मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्यातील हरिपूर येथे झाला. मध्य प्रदेशकडूनच तो प्रथम श्रेणीसह टी-क्रिकेट खेळतो. कुलदीपचे वडील सलूनचे दुकान चालवतात. पाच भावंडामधील तिसरा असलेला कुलदीप सेन वयाच्या आठव्या वर्षांपासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे क्रिकेटमध्ये करियर करणं त्याच्यासाठी मोठी कसोटीच होती. पण तो ज्या क्रिकेट अकादमीकडून खेळत होता त्यांनी त्याची फी माफ केली आणि त्याचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न साकार करण्यास मोलाचे योगदान दिले. 2018 मध्ये त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
आपल्या पदार्पणाच्या सामन्यात कुलदीप सेन याने पंजाब विरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या.कुलदीप सेन याने आतापर्यंत 16 प्रथम श्रेमी सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात चार विकेट जमा आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 13 विकेट्स जमा आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.