पहिल्या आयपीएल विकेटनंतर क्रिकटे विश्वात नुसती अर्जुन तेंडुलकरची हवा पाहायला मिळत आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने एक विकेट घेत थेट टीम इंडियात दावेदरी ठोकली आहे. (IPL 2023 arjun tendulkar best performance Call up team india)
मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादचा त्यांच्याच मैदानावर 14 धावांनी पराभव करत आपल्या विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. या विजयानंतर अर्जुन तेंडुलकर लवकरच भारतीय संघात पदार्पण करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
2.5 षटके टाकत 18 धावांमध्ये 1 विकेट घेतली. त्याने 6.40 च्या सरासरी धावा देत किफायतशीर गोलंदाजी केली. अर्जुन तेंडुलकरने जरी फार विकेट्स घेतल्या नसल्या तरी त्याच्या किफायतशीर गोलंदाजीचा इतर गोलंदाजांना विकेट्स घेण्यात फायदाच झाला. अर्जुनने 20 व्या षटकात भुवनेश्वर कुमारला बाद करत आपली पहिली आयपीएल विकेट घेतली.
शेवटच्या ओव्हरचा थरार
हैदराबादला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची आवश्यकता होती. कॅप्टन रोहित शर्मा याने अर्जुन तेंडुलकरला ओव्हर सोपवली.अर्जुनने पहिला बॉल समदला डॉट टाकला, वाईट यॉर्कर असल्याने हा चेंडू इशान किशनने अडवला नसता तर चौकारच असता. दुसरा बॉलवर 2 धावा घेताना समद रनआऊट झाला. त्यानंतर 4 बॉलमध्ये 19 धावांची असा सामना आला.
मात्र अर्जुन तेंडुलकरने वाईड चेंडू टाकला आणि एक धाव मिळाली. त्यानंतर 4 चेंडू 18 अशी स्थिती आली. तिसऱ्या चेंडूवर मार्केंडयन 2 धावा घेतला. तेव्हा 3 चेंडू 16 अशा धावा हव्या होत्या. चौथ्या चेंडूवर 1 धाव मिळाली आणि विजय निश्चित झाला. पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमार बाद झाला आणि संपूर्ण संघ ऑलआउट झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.