Brett Lee Video : आराम से आराम से… ब्रेट लीने उत्साही कार्यकर्त्याला दिला हिंदीतून सल्ला; VIDEO व्हायरल

ipl 2023 austrailian cricketer brett lee speak hindi with two rcb fans on bike shares video
ipl 2023 austrailian cricketer brett lee speak hindi with two rcb fans on bike shares video
Updated on

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली हा जगातील सर्वात घातक गोलंदाजांमध्ये गणला जातो. यामुळेच ब्रेट लीचे चाहते तुम्हाला जगभरात पाहायला मिळतील. त्याचे भारतात देखील हजारो चाहते आहेत. त्याच वेळी ब्रेट लीला भारत आणि तेथील लोकांबद्दल विशेष प्रेम आहे आणि त्याने ते यापूर्वी अनेकदा बोलूनही दाखवले आहे.

सध्या ब्रेट ली इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) साठी तज्ञ म्हणून काम करत आहे आणि भारतात आहे. अलीकडेच, त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कारमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे आणि दोन क्रिकेट चाहते त्याला सेल्फी मागत आहेत.

ipl 2023 austrailian cricketer brett lee speak hindi with two rcb fans on bike shares video
IPL 2023 : शांत फ्लेंमिंगनं पराभवानंतर काढला जाळ! असं काही बोलला की खळबळच उडाली

रात्री मुंबईत फिरत असताना ब्रेट लीला त्याचे दोन चाहते भेटले. ज्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची जर्सी परिधान केली होती. एकीकडे ब्रेट ली कारमध्ये जात असताना, दुसरीकडे, दोन्ही चाहते त्याला सेल्फी घेण्याचा आग्रह करत स्कूटर चालवताना दिसत आहेत.

यानंतर ब्रेट लीने आपल्या कारची काच खाली केली आणि त्यांना हिंदीत सांगितले की गाडी आरामात चालवा आणि दोघांनाही हेल्मेट घालण्यास सांगितले. या घटनेची व्हिडीओ क्लिप ब्रेट लीने त्याच्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे. यासोबत लिहीलेल्या कॅप्शनमध्ये भारत नेहमीच आश्चर्यकारक चांगल्या गोष्टींनी भरलेला असतो. इथल्या लोकांच्या पॅशनच्या प्रेमात पडलोय असं म्हटलं आहे.

ipl 2023 austrailian cricketer brett lee speak hindi with two rcb fans on bike shares video
Asad Ahmed Encounter : अतिक अहमदच्या मुलाचे एन्काउंटर, CM योगींची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल लीगचा 17 वा सामना बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये आरआरने शेवटच्या चेंडूवर 3 धावांनी सामना जिंकला. या विजयासह संजू सॅमसन अँड कंपनीने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. स्पर्धेतील आजच्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()