CSK CEO Kasi Viswanathan on MS Dhoni Retirement : चेपॉक येथे रविवारी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लॅप ऑफ ऑनरमध्ये भाग घेतला.
तेव्हापासून धोनी या सीझननंतर आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी या अटकळांचे खंडन केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काशीने म्हटले की, आम्हाला विश्वास आहे की एमएस धोनी पुढील सीझनमध्येही खेळणार आहे. त्यामुळे मला आशा आहे की चाहते दरवेळेप्रमाणेच आम्हाला साथ देत राहतील.(CSK CEO Kasi Viswanathan opines on MS Dhoni's future at the IPL)
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ चमकदार खेळ करत आहे. संघाने आतापर्यंत 13 पैकी सात सामने जिंकले असून त्यांचे 15 गुण आहेत. संघाने पाच सामनेही गमावले आहेत. धोनीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
सीएसकेला आता आणखी एक सामना खेळायचा आहे, जो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फिरोजशाह कोटला येथे होणार आहे. अशा परिस्थितीत सीएसकेला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी तो सामना जिंकावा लागेल. तसे न झाल्यास संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
गतवर्षी धोनीने हंगाम सुरू होण्यापूर्वी सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर रवींद्र जडेजाला कर्णधार करण्यात आले. मात्र, सुरुवातीच्या अनेक सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला.
या मधल्या मोसमानंतर जडेजाला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि धोनी पुन्हा कर्णधार झाला. यानंतर त्यांच्या संघाने या मोसमात चमकदार कामगिरी केली. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचे खेळाडू पूर्ण जोश आणि उत्साहाने खेळत आहेत. अशा स्थितीत सीएसके व्यवस्थापनाला त्यांनी आता निवृत्ती घ्यावी असे वाटत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.