MS Dhoni Video : चार वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्स ने आयपीएल २०२३ च्या २९ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला ७ विकेट्सवर १३४ धावांवर रोखले. शुक्रवारी रात्री चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात रवींद्र जडेजाच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. एका फलंदाजाला त्याने आपल्या फिरकीत अडकवले.
धोनीने डावाच्या १४व्या षटकासाठी रवींद्र जडेजाकडे चेंडू सोपवला. त्याच षटकातील ५व्या चेंडूवर मयंक अग्रवालला धोनीने यष्टिचित केले. मयंकने जडेजाच्या शॉर्ट बॉलवर पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू थेट धोनीच्या ग्लोव्हजमध्ये गेला आणि त्याने मयंकला यष्टिचित केले आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
मयंकने ४ चेंडूंचा सामना केला आणि ३ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे हैदराबाद संघाची ५वी विकेट पडली. जडेजाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहून सगळेच धोनीचे कौतुक करत आहेत. धोनीचा वेग आणि स्टंप आऊट करण्याच्या वेगळ्या पद्धतीचे यापूर्वीच कौतुक झाले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.