MS Dhoni Video : कार्तिकची चूक पाहून चाहत्यांना आठवला धोनी! 7 वर्ष जुना Video Viral

IPL 2023 dinesh karthik fumbles in rcb vs lsg match ms dhoni 7 years old video goes viral
IPL 2023 dinesh karthik fumbles in rcb vs lsg match ms dhoni 7 years old video goes viral
Updated on

आयपीएल-2023 (IPL 2023) मध्ये सोमवारी लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका हाय व्होल्टेज सामन्यात पराभव केला . अखेरच्या चेंडूवर या सामन्याचा निर्णय झाला. हर्षल पटेल हा गोलंदाज होता. फलंदाज आवेश खान होता.पटेलने चेंडू फेकला आणि आवेश खान बॉल खेळू शकला नाही.

पण लखनऊच्या फलंदाजांनी विकेट किपर दिनेश कार्तिकच्या हातातून धावा काढून विजय मिळवला.यानंतर अनेकांना महेंद्रसिंग धोनीची उणीव भासत आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने दोन गडी गमावून 212 धावा केल्या होत्या. लखनऊसाठी हे लक्ष्य अवघड वाटत होते पण शेवटच्या चेंडूवर त्यांनी हे लक्ष्य गाठले आणि एका विकेटने विजय मिळवला.

IPL 2023 dinesh karthik fumbles in rcb vs lsg match ms dhoni 7 years old video goes viral
IPL 2023 : तोंडावर बोट अन्... लखनऊच्या थरारक विजयावर गौतम गंभीरने RCBच्या चाहत्यांना चिडवले

कार्तिकची ती चुक अन् लोकांना आठवला धोनी..

शेवटच्या चेंडूवर निघालेली एक धाव वाचवता आली असती पण कार्तिकने चूक केली जी संघाला महागात पडली. कार्तिक शेवटचा चेंडू पकडू शकला नाही आणि चेंडू त्याच्या हातातून निसटला, त्यामुळे लखनऊ फलंदाजांना त्याच्या हातातून धावा चोरता आली. इथेच सगळ्यांना धोनी आठवला. यानंतर आता त्याचा सात वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ T20 विश्वचषक-2016 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचा आहे. या सामन्यात धोनीने शेवटच्या चेंडूवर समजूतदारपणा दाखवत हातमोजे आधीच काढून ठेवले होते. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पंड्याने बॉल टाकला जो फलंदाजाला खेळता आला नाही आणि धोनीने शांतपणे चेंडू पकडला आणि धावत येऊन स्टंप उडवले. कार्तिकची अ‍ॅक्शन पाहून सर्वांनाच आता धोनीची उणीव भासत असून धोनीसारखा यष्टिरक्षक होऊ शकत नाही, असे बोलले जात आहे.

IPL 2023 dinesh karthik fumbles in rcb vs lsg match ms dhoni 7 years old video goes viral
Shiv Sena : 'बाळासाहेब बाबरी कांड प्रकरणात प्रमुख आरोपी होते, हे भाजपला माहिती नाही का?'

कार्तिकच्या चुकीमुळे मात्र बंगळुरूच्या गोलंदाजांनी निराशा झाली.संघाच्या फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली होती. लखनऊला 213 धावा करायच्या होत्या. त्याची सुरुवातही चांगली झाली नाही. त्याने केवळ 23 धावांत आपले तीन विकेट गमावले. त्यात काइल मायर्ससारख्या झंझावाती फलंदाजाच्या विकेटचा समावेश होता. मात्र यानंतर निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस यांनी शानदार खेळी केली.

पूरण आणि स्टॉइनिस यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजांना धो धो धुतलं. पूरनने अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 19 चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. स्टॉइनिसने 30 चेंडूंचा सामना करताना सहा चौकार आणि पाच षटकार मारले. या दोघांशिवाय आयुष बधोनीने 24 चेंडूत 30 धावा केल्या. बंगळुरूसाठी पटेलने चार षटकांत 48 धावा आणि कर्ण शर्माने तीन षटकांत 48 धावा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.