IPL 2023 Slow Over Rate : चुकीला माफी नाही! BCCI रोज लाखो रूपये वसूल करतंय, आयपीएलमधील कर्णधार वैतागले

IPL 2023 Slow Over Rate
IPL 2023 Slow Over Rate esakal
Updated on

IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात षटकांची गती कमी राखल्यामुळे कारवाई करण्यात आली. त्याला 12 लाख रूपयांचा दंड झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादचा 7 धावांनी पराभव केला. दरम्यान, आयपीएलने आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, 'सामन्यात षटकांची गती कमी ठेवण्याचा हा या संघाचा हा पहिलाच गुन्हा आहे. त्यामुळे कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर 12 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात येतोय.'

IPL 2023 Slow Over Rate
GT vs MI Playing 11 : पंजाबकडून धुलाई झालेली मुंबई आपली प्लेईंग 11 बदलणार?

सामना तीन तास 20 मिनिटात संपवला जावा यासाठी आयपीएलचा संथ षटकांची गती राखणाऱ्या कर्णधारांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र काही सामने चार तासांपेक्षाही जास्त काळ सुरू राहिले. यंदाच्या आयपीएल हंगामात पहिल्यांदाच कर्णधारावर स्लो ओव्हर रेटमुळे दंडात्मक कारवाई झालेली नाही. यापूर्वी संजू सॅमसन, केएल राहुल, एमएस धोनी, फाफ ड्युप्लेसिस, विराट कोहली यांच्यावर देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

आरसीबीने दोनवेळा स्लो ओव्हर रेटचा नियम भंग केल्याने कोहलीला 24 लाखाचा दंड आणि संघातील खेळाडूंना 6 लाख रूपये किंवा सामन्याच्या फीपैकी 25 टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेण्यात आली आहे.

IPL 2023 Slow Over Rate
WTC Team India Squad: 15 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! रहाणे पुन्हा एकदा संघात सुर्या बाहेर

आता जर आरसीबीने पुन्हा एकदा स्लो ओव्हर रेटच्या नियमाचा भंग केला तर त्याच्या कर्णधाराला एका सामन्याच्या बंदीला सामोरे जावे लागेल. तसेच 30 लाख रूपयांचा दंडही भरावा लागणार आहे. याचबरोबर जर संघाने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला शेवटच्या षटकात फक्त 4 खेळाडूच 30 यार्ड सर्कलच्या बाहरे ठेवता येणार आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()