IPL 2023 Final :चेन्नई-गुजरात सामन्यात पावसाचे विघ्न! रविवारचा पूर्ण दिवस वाया; आता अंतिम सामना आज होणार

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ही लढत सुरु होईल असे वाटत होते पण....
 
ipl 2023 gt vs csk final weather ahmedabad
ipl 2023 gt vs csk final weather ahmedabad
Updated on

CSK vs GT IPL 2023 Final : चेन्नई सुपरकिंग्स व गुजरात टायटन्स यांच्यामधील आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील अंतिम सामन्यात पावसाने हजेरी लावली. सामनाधिकारी, पंच यांनी रात्री 11वाजेपर्यंत सामना सुरु करण्याचे प्रयत्न केले. पण पाऊस थांबला नसल्यामुळे अखेर आता ही लढत राखीव दिवशी अर्थातच आज (ता.29) खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

चेन्नई - गुजरात यांच्यामधील लढतीवर जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळल्या होत्या. पण ही लढत सुरु होण्याआधीपासूनच वरुणराजाचे आगमन झाले होते. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ही लढत सुरु होईल असे वाटत होते. पण काही वेळानंतर पुन्हा एकदा पाऊस सुरु झाला. दोन संघांमध्ये प्रत्येकी पाच षटकांचा सामनाही होऊ शकणार नव्हता. त्यामुळे लढत पुढे ढकलण्यात आली.

 
ipl 2023 gt vs csk final weather ahmedabad
IPL Final 2023: फॅन्ससाठी BCCI घेतला मोठा निर्णय! जुन्या तिकिटांसह 'रिझर्व्ह डे'ला सामना बघता येणार फक्त...

दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वात लोकप्रिय असलेला महेंद्रसिंह धोनी यंदाच्या स्पर्धेत विक्रमांवर विक्रम करत आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्धचा अंतिम सामना हा धोनीचा 250 वा आयपीएल सामना ठरणार आहे. असे झाल्यास अशी कामगिरी करणारा तो आयपीएल इतिहासातील एकमेव खेळाडू असेल.

2008 मध्ये आयपीएलचा श्रीगणेशा झाला तेव्हापासून आत्तापर्यंत झालेल्या आयपीएल स्पर्धेत 11 अंतिम सामने खेळणारा धोनी एकमेव खेळाडू आहे. यापैकी 10 वेळा तो चेन्नईचा कर्णधार म्हणून आयपीएल अंतिम सामना खेळला आहे. 2017 मध्ये तो रायझिंग पुणे सुपरजायंटस्‌ संघातून अंतिम सामना खेळला होता. तो सामना मुंबई इंडियन्सने जिंकून विजेतेपद मिळवले होते.

 
ipl 2023 gt vs csk final weather ahmedabad
IPL Final Weather Forecast: आजही पाऊस! IPL फायनल झाली नाही तर धोनीचे स्वप्न भंगणार?

गुजरातविरुद्धच्या सामन्याअगोदर धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने चार वेळा विजेतेपद मिळवलेले आहे; तर 2008, 2012, 2013, 2015 आणि 2019 मध्ये त्यांना उपविजेपदावर समाधान मानावे लागले होते.

धोनी हा अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा चेन्नईकडून तिसरा फलंदाज आहे. सहा सामन्यांत त्याने 180 धावा केल्या होत्या; तर सुरेश रैना हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

 
ipl 2023 gt vs csk final weather ahmedabad
IPL : आता देशाकडूनही असा फॉर्म कायम ठेव! रोहित शर्मा

धोनीसह मुंबई इंडियन्सचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माही 2008 पासून आयपीएल सातत्याने खेळत आहे. तो धोनीनंतर सर्वाधिक सामने (243) खेळणारा खेळाडू आहे. रोहित शर्मा सुरुवातीला डेक्कन चार्जर्स या संघातून खेळला होता. 2009 मध्ये या संघाने विजेतेपद मिळवले होते, त्या वेळी रोहित शर्माने मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिकही घेतली होती.

आयपीएलच्या इतिहासात धोनीने अंतिम सामन्याअगोदर पाच हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात त्याने 24 अर्धशतके करताना 234 षटकारही मारलेले आहेत. टी-20 या प्रकारात धोनी भारताकडून सर्वाधिक सामने खेळलेला तिसरा खेळाडू आहे. धोनी एकूण 377 टी-20 सामने खेळला आहे; तर रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्या नावावर अधिक सामने आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.