CSK vs GT IPL Final 2023 : 58 दिवस, 73 सामन्यांनंतर आयपीएल जिथून सुरुवात झाली होती तिथे पोहोचली आहे. आयपीएलचा अंतिम सामना त्याच दोन संघांमध्ये होणार आहे जे सीझनच्या सुरुवातीच्या सामन्यात आमनेसामने आले होते. आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्स आणि 4 वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.
आता कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचा धोका आहे. अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर 2 सामनाही पावसामुळे 45 मिनिटांसाठी खंडित झाला होता.
नाणेफेक संध्याकाळी 7.00 ऐवजी 7.45 वाजता झाली, तर सामना रात्री 8.00 वाजता सुरू झाला. मात्र पूर्ण सामना खेळला गेला. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील फायनलमध्येही पावसाचा धोका आहे. या सामन्यात पाऊस पडल्यास आणि सामना रद्द झाल्यास काय होईल ते जाणून घेऊया.
गेल्या काही दिवसांत देशातील बहुतांश भागात पाऊस पडला आहे आणि याचा परिणाम आयपीएल 2023 च्या सर्वात महत्त्वाच्या सामन्यावर होऊ शकतो. भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे की 28 मे रोजी अहमदाबादच्या बहुतांश भागात हवामान स्वच्छ असेल.
मात्र, Accuweather च्या अहवालानुसार अहमदाबादमध्ये रविवारी संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी संध्याकाळी पावसाची 40 टक्के शक्यता आहे. अहवालानुसार, अहमदाबादमध्ये एकूण दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. सूर्यास्तानंतर पावसासह संध्याकाळी 50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे.
फायनलसाठी राखीव दिवस आहे का?
आयपीएल 2022 मध्ये फायनलसाठी राखीव दिवस होता, परंतु बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्लेऑफ वेळापत्रकानुसार यंदा आयपीएल 2023 फायनलसाठी कोणताही राखीव दिवस नाही.
पावसाने संपूर्ण सामना वाहून गेला तर?
जर एखाद्या संघाने पहिल्या डावात आपली सर्व षटके खेळली तर दुसऱ्या संघालाही डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्यासाठी पाच षटके खेळावी लागतील. इतर संघाने पाच षटके खेळल्यानंतर सामना पावसामुळे वाहून गेला तर, विजेता ठरवण्यासाठी डकवर्थ-लुईस पद्धत वापरली जाईल. काही कारणास्तव दोन्ही किंवा कोणताही एक संघ पाच षटके खेळू शकला नाही आणि कट ऑफ टाइम ओलांडल्यानंतर पाऊस थांबला, तर काही नियम लागू केले जातील. जाणून घेऊया...
दोन्ही संघ सुपर ओव्हर खेळतील आणि सुपर ओव्हरमध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल हे ठरविले जाईल. विजेत्या संघाचे निर्धारण करण्यासाठी उपलब्ध वेळेत परिस्थिती सुपर ओव्हरला परवानगी देत नसेल, तर साखळी फेरीत गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेला संघ विजेता मानला जाईल. साखळी फेरीअखेर गुजरात 20 गुणांसह अव्वल, तर चेन्नई 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होते. पावसामुळे सामना अजिबात झाला नाही तर गुजरात टायटन्सचा संघ चॅम्पियन होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.