IPL 2023 : माहीचं इम्पॅक्ट प्लेयरचं गणित फसलं! ठरला चेन्नईच्या पराभवाचं मोठं कारण

इम्पॅक्ट प्लेयरची युक्ती माहीवर उलटली अन्...
 CSK Impact Player | Cricket News in Marathi
CSK Impact Player | Cricket News in Marathisakal
Updated on

IPL 2023 CSK Impact Player : आयपीएलच्या नव्या हंगामाची जोरदार सुरुवात झाली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी काही ना काही बदल पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत आयपीएल 2023 मध्येही मोठा बदल पाहायला मिळाला. जसं की इम्पॅक्ट प्लेयर. याचा अर्थ असा की प्रत्येक संघ या वर्षी इम्पॅक्ट प्लेअरच्या अंतर्गत सामन्यादरम्यान संघातील एका खेळाडूला बदलून त्याऐवजी दुसरा खेळाडू खेळवता येईल. विदेशी खेळाडूचा यादरम्यान इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार नाही.

IPL 2023 चा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान आयपीएलच्या इतिहासातील पहिला इम्पॅक्ट प्लेअर खेळाडू तुषार देशपांडेच्या रूपाने चेन्नईने वापरला. विशेष म्हणजे तुषारने आपल्या कामगिरीने सर्वांची निराशा केली.

 CSK Impact Player | Cricket News in Marathi
IPL 2023: पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली संघासह वॉर्नरचीही परीक्षा! केएल राहुलचा संघ यंदाही ठसा उमटवणार?

गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात जेव्हा सुपर किंग्स गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा त्यांनी फलंदाज अंबाती रायडूच्या जागी गोलंदाज तुषार देशपांडेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात घेतले.

मात्र, महेंद्रसिंग धोनीचं इम्पॅक्ट प्लेयरचं गणित फसलं. तुषारला गुजरातच्या फलंदाजांनी चांगला चोप दिला. देशपांडेने 3.2 षटकात 15.30 च्या खराब अर्थव्यवस्थेत गोलंदाजी केली, 51 धावा दिल्या आणि फक्त 1 विकेट घेतला.

 CSK Impact Player | Cricket News in Marathi
IPL 2023: लाखो लोकांच्यासमोर अरिजित सिंग पडला धोनीच्या पाया! कारण काय बॉलीवूडला पडला प्रश्न

यासह सीएसकेने पहिला सामना 5 विकेटने गमावला. चेन्नईच्या या पराभवात तुषार देशपांडेच्या खराब कामगिरीचा मोठा हात होता. अशा परिस्थितीत इम्पॅक्ट प्लेयर खेळणे चेन्नईला महागात पडले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

याशिवाय गुजरात टायटन्सने जखमी केन विल्यमसनच्या जागी साई सुदर्शनचा प्रभावशाली खेळाडू म्हणून समावेश केला आहे. चेन्नईविरुद्ध साईने 3 चौकारांच्या मदतीने 17 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.