IPL 2023 : 'पीछे तो देखो पीछे...' व्हिडिओ शेअर करत गुजरातने चेन्नई मुंबईला डिवचलं?

Gujarat Titans
Gujarat Titansesakal
Updated on

IPL 2023 Gujarat Titans Viral Video : इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात आपल्याला एका पेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. त्यापेक्षाही रोमांचक झाले आहेत प्ले ऑफचे समीकरण. कारण या हंगामात आत्तापर्यंत 64 सामने खेळले गेले पण एकच संघ पात्र ठरला आहे. गुजरात टायटन्सने सोमवारी सनरायझर्स हैदराबादचा 34 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरात प्लेऑफसाठी पात्र ठरला.

Gujarat Titans
IPL Playoffs Race : RCBच्या स्वप्नांवर पाणी फेरणार? हैदराबादने अनेकदा विराट कोहलीला दिल्या खोल जखमा...

प्लेऑफमध्ये अजून तीन जागा शिल्लक आहेत, ज्यासाठी 7 संघांमध्ये शर्यत आहे. गुजरात पात्र ठरले आहे, तर हैदराबाद आणि दिल्ली शर्यतीतून बाहेर आहेत. गुजरातचा संघ पात्र ठरल्यानंतर त्यांनी इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पीछे तो देखो पीछे...' आम्ही चांगल्या आठवणींसह लीग स्टेज सोडत आहे आणि पुढे जात आहोत... प्लेऑफमध्ये.

गुजरात टायटन्सचा हा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला, तसे चाहत्यांच्या अनेक कमेंट या व्हिडिओवर पाहायला मिळत आहे. चाहत्यांना एकच प्रश्न पडला की गुजरातने चेन्नई मुंबईला डिवचलं का?

Gujarat Titans
IPL 2023 Playoffs Scenario : दिल्ली कॅपिटल्सने वाढवली धोनीची चिंता! CSK प्ले-ऑफमधून बाहेर?

कारण गतविजेता गुजरात टायटन्सने 18 गुणांसह प्लेऑफमध्ये गेली आहे. 13 सामन्यांत 9 विजय आणि 4 पराभव आहेत. संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. गुणतालिकेत चार वेळची चॅम्पियन सीएसके दुसऱ्या तर पाच वेळेची चॅम्पियन मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे. गुणतालिका पाहता यावर एक चाहत्याने कमेंट करत लिहिले की, गुजरात फक्त चेन्नई आणि मुंबईच्या फॅन्सला चिडवत आहे.

Gujarat Titans
IPL 2023 Playoffs Scenario: पंजाबच्या पराभवाने या दोन संघांचा मार्ग मोकळा! प्ले-ऑफचे समीकरण झाले स्पष्ट

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत 13 सामने खेळले असून, 7 जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत आणि त्यांचे 15 गुण आहेत. लखनऊ सुपर जायंट्स 13 सामन्यांत 15 गुणांसह तिसऱ्या तर मुंबई इंडियन्स 13 सामन्यांत 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. अशाप्रकारे, गुजरात टायटन्स व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स टॉप-4 मध्ये आहेत.

गुजरातला 21 मे रोजी बेंगळुरूमध्ये आरसीबीविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. हे जिंकल्यानंतर संघ टॉप-2 मध्ये स्थान मिळवेल आणि क्वालिफायर-1 मध्ये पोहोचेल. दुसरीकडे शेवटचा सामना गमावल्यानंतर संघाला क्वालिफायर-1 मध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.