IPl 2023 : चेन्नईसमोर आता लखनौचे आव्हान

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सचा संघ चार वेळा आयपीएल विजेता ठरला आहे.
IPl 2023 : चेन्नईसमोर आता लखनौचे आव्हान
Updated on

चेन्नई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सचा संघ चार वेळा आयपीएल विजेता ठरला आहे. यंदाचा मोसम हा धोनीचा अखेरचा मोसम असणार आहे. या मोसमाची सुरुवातही निराशाजनक झाली. सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सला गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागली.

याच पार्श्वभूमीवर धोनीच्या संघासमोर उद्या के. एल. राहुलच्या लखनौ सुपरजायंटस्‌ संघाचे आव्हान असणार आहे. याप्रसंगी चेन्नई सुपर किंग्सला विजयाची बोहणी करावयाची आहे, तर लखनौ सुपर जायंटस्‌ संघाला सलग दुसरा विजय मिळवायचा आहे.

सलामीच्या लढतीत ऋतुराज गायकवाड वगळता चेन्नईच्या एकाही फलंदाजाला ठसा उमटवता आला नाही. ऋतुराज याने गुजरातविरुद्धच्या लढतीत ५० चेंडूंमध्ये ४ चौकार व ९ षटकारांची आतषबाजी करताना ९२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. ऋतुराजच्या दमदार फलंदाजीनंतरही चेन्नईला २० षटकांत ७ बाद १७८ धावाच करता आल्या.

शुभमन गिल, रिद्धीमान साहा, साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतिया व राशीद खानच्या झंझावातासमोर चेन्नईच्या गोलंदाजांचा निभाव लागला नाही. चेन्नईच्या फलंदाजांना आगामी सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर वर्चस्व गाजवावे लागणार आहे. ऋतुराजसह डेव्होन कॉनवे, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू यांना आपली जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे. महेंद्रसिंग धोनीचा अनुभव दिमतीला असेलच.

IPl 2023 : चेन्नईसमोर आता लखनौचे आव्हान
Nagpur : कुटुंबप्रमुखांच्या बचतीवर महागाईची कुऱ्हाड

चेन्नईसाठी जमेची बाजू म्हणजे त्यांचे अष्टपैलू खेळाडू. रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मिचेल सँटनर व दीपक चहर या अष्टपैलू खेळाडूंच्या समावेशामुळे चेन्नईच्या संघाला आणखी बळकटी मिळते.

चेन्नईच्या संघात सलामीच्या लढतीत महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंची वर्णी लागली होती. राजवर्धन हंगरगेकर व तुषार देशपांडे (मुंबई) ही त्यांची नावे. राजवर्धन याने ३ विकेट टिपत चमक दाखवली, पण तुषारच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्यात आले.

IPl 2023 : चेन्नईसमोर आता लखनौचे आव्हान
Nagpur News : निवृत्तीच्या दिवशी पदोन्नती!

आजची लढत

चेन्नई सुपर किंग्स - लखनौ सुपर जायंटस् | ठिकाण - एमए चिदंबरम स्टेडियम

वेळ - संध्याकाळी ७.३० वाजता | प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस्

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.