GT vs CSK Dream11: गुरु शिष्य आमने-सामने! थोडक्यात जाणून घ्या ड्रीम इलेव्हन

 IPL 2023 Match 1 Gujarat Vs Chennai Dream11 Team Prediction Captain Playing 11 cricket news in marathi
IPL 2023 Match 1 Gujarat Vs Chennai Dream11 Team Prediction Captain Playing 11 cricket news in marathi
Updated on

Gujarat Vs Chennai Dream11 : ज्या खेळाडूला गुरुस्थानी मानले त्याच्याविरुद्धच आजपासून गतविजेता हार्दिक पंड्या आयपीएलचे विजेतेपद राखण्याची मोहीम सुरू करणार आहे. गुजरात टायटंस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

 IPL 2023 Match 1 Gujarat Vs Chennai Dream11 Team Prediction Captain Playing 11 cricket news in marathi
IND vs PAK World Cup 2023: ODI वर्ल्डकप पाकिस्तान भारतातच खेळणार; ICCने चर्चांना लावला पूर्णविराम

पदार्पणात विजेतेपद मिळवून हार्दिक पंड्याच्या गुजरात संघाने सर्वांना चकित केले. समतोल संघ ही त्यांची बाजू संपूर्ण स्पर्धेत उजवी ठरली होती. यंदाही जवळपास तोच संघ असल्यामुळे आत्मविश्वास त्यांच्या बाजूने आहे; परंतु समोर चार विजेतेपद मिळवणारा, आणि भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनी असल्यामुळे गुजरातसाठी सलामीची ही लढत सोपी असणार नाही.

 IPL 2023 Match 1 Gujarat Vs Chennai Dream11 Team Prediction Captain Playing 11 cricket news in marathi
IPL 2023: चाहत्यांसाठी वाईट बातमी! एमएस धोनी पहिल्याच सामन्यातून बाहेर?

'इम्पॅक्ट खेळाडू' हा नवा बदल यंदाच्या आयपीएलमध्ये असणार आहे. त्याचा उपयोग कसा आणि कधी करायचा याबाबत सर्व संघ अनभिज्ञ आहेत; परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही बदलांचा परिणामकारक वापर करण्यात धोनीचा हातखंडा आहे. त्यामुळे उद्याच्या सलामीच्या सामन्यात चौकार-षटकार आणि विकेट याचबरोबर इम्पॅक्ट खेळाडूच्या वापराची उत्सुकता सर्वांनाच असेल.

 IPL 2023 Match 1 Gujarat Vs Chennai Dream11 Team Prediction Captain Playing 11 cricket news in marathi
IND vs PAK ODI News: भारत-पाकिस्तान संघात सप्टेंबरमध्ये होणार 3 वनडे! वेळापत्रकात मोठा बदल

या खेळाडूंवर असणार लक्ष

  • गुजरात : हार्दिक पंड्या, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, राहुल तेवटिया, रशिद खान.

  • चेन्नई: महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, मिशेल सँतनर.

एकमेकांविरुद्ध

■ सामने २ ■ विजय : गुजरात : २ - चेन्नई : 0

■ सर्वाधिक धावा: गुजरात: १७० : चेन्नई : १६९

■ अखेरच्या तीन सामन्यांत : गुजरात: एक पराभव दोन विजय चेन्नई : तिन्ही सामन्यांत पराभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()