IPL 2023 News : आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग 31 मार्चपासून धुमधडाक्यात सुरू झाले आहे. आयपीएल 2023 मध्ये चाहत्यांना दररोज एकापेक्षा जास्त सामने पाहायला मिळत आहेत. हळूहळू आयपीएलची रंगत आता देशभर पसरत आहे.
आयपीएलच्या 16 व्या आवृत्तीच्या पहिल्या आठवड्यात आतापर्यंत अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले आहे, ज्यात युझवेंद्र चहल, विराट कोहली, जोस बटलर, तिलक वर्मा यांचा समावेश आहे. पण ज्या परदेशी खेळाडूंवर फ्रँचायझींनी आयपीएल 2023च्या मिनी लिलावात पावसासारखे पैसे पाडले होते ते पहिल्याच सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरले.
बेन स्टोक्स असो वा कॅमेरॉन ग्रीन, हॅरी ब्रूक्स असो की सॅम करन प्रत्येकालाच त्यांच्या कामगिरीने चीड आली आहे. नाव मोठे आणि दर्शन छोटे ही म्हण या खेळाडूंना अगदी चपखल बसते. चला तर मग अशा परिस्थितीत या खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकूया....
इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने मिनी लिलावात तब्बल 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले. पण पहिल्या सामन्यात स्टोक्स पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने केवळ 7 धावा केल्या आणि दुखापतीमुळे गोलंदाजी केली नाही.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा युवा आणि धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयांना लिलावात सामील करून घेतला. त्याने आरसीबीविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 5 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 2 षटकात 30 धावा दिल्या. जरी ग्रीनने एक विकेट घेतली. पण ते खूप महाग ठरले.
सॅम करणला पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. विशेष म्हणजे हा इंग्लिश खेळाडूही आपली योग्यता सिद्ध करू शकला नाही. केकेआरविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना करणने 17 चेंडूत केवळ 26 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीत 1 बळी घेतला पण 3 षटकात 38 धावा दिल्या.
हॅरी ब्रूकला ऑरेंज आर्मीमध्ये सामील होण्यासाठी सनरायझर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपये दिले होते. पण आयपीएलच्या पहिल्या सामन्यात त्याला 21 चेंडूत केवळ 13 धावा करता आल्या. युझवेंद्र चहलने त्याला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.