MS Dhoni CSK Victory : आयपीएल 2023 संपली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
मोहित शर्मा घातक गोलंदाजी करत होता आणि तो गुजरातला विजय मिळवून देईल असे वाटत होते, पण तसे होऊ शकले नाही. दुसऱ्या डावात पावसामुळे सामना 15 षटकांचा करण्यात आला आणि सीएसकेला विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. सामन्यात चढ-उतार होते, पण शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावा करायच्या होत्या तेव्हा सगळ्यांचा श्वास रोखला गेला.
सीएसके संघाचा कर्णधार एमएस धोनी देखील डगआउटमध्ये थोडा अस्वस्थ दिसत होता. दोन चेंडूत 10 धावा करायच्या असताना मोहित शर्माच्या शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाने शानदार षटकार ठोकला. यानंतर विजयासाठी एका चेंडूत 4 धावा करायच्या होत्या आणि त्यानंतर धोनीने डगआउटमध्ये डोळे बंद केले.
त्यानंतर जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला, पण त्यावेळी धोनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, काही वेळाने तो पुन्हा तिथून उठला आणि नंतर मैदानावर गेला आणि त्याने रवींद्र जडेजाला उचलले.
त्याचवेळी रवींद्र जडेजाच्या विजयी शॉटनंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेली त्याची पत्नी रिबाबा जडेजाही मैदानावर पोहोचली आणि त्याला मिठी मारून अभिनंदन केले. विजयानंतर रवींद्र जडेजा म्हणाला की मी हा विजय एमएस धोनीला समर्पित करतो. माझ्या घरच्या प्रेक्षकांसमोर पाचवे विजेतेपद जिंकणे ही खूप मोठी भावना आहे. सीएसकेला पाठिंबा देण्यासाठी ते मोठ्या संख्येने आले आणि सर्वजण रात्री उशिरापर्यंत पाऊस थांबण्याची वाट पाहत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.