MS Dhoni IPL 2023: दुखापतग्रस्त धोनीची जागा आता कोण घेणार? या इंग्रजी प्लेअरची जोरदार चर्चा

धोनीच्या गुडघ्याला दुखापत
IPL 2023 MS Dhoni Injury Replacement as CSK Captain
IPL 2023 MS Dhoni Injury Replacement as CSK Captain
Updated on

यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरुवात खराब झाली. पराभव, जायबंदी खेळाडू या सर्वांमुळे संघाचे टेन्शन वाढलं आहे. अशातच आता संघाला मोठा झटका बसला आहे. महेंद्रसिंह धोनीदेखील जायबंदी झाला आहे. त्यामुळे त्याची जागा कोण घेणार या चर्चेने क्रिकेट वर्तुळात उधाण आलं आहे. (IPL 2023 MS Dhoni Injury Replacement as CSK Captain)

चेन्नईच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत ड्वेन ब्राव्हो, बेन स्टोक्स या आणि यासारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यात आता धोनीदेखील सहभागी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.

आता हेड कोच फ्लेमिंग यांनी त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. दुसऱ्या बाजूला धोनी पुढी सामन्यात खेळू शकणार की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, सीएसकेच्या संघामध्ये धोनीच्या जागेवर बेन स्टोक्स आणि ऋतुराज गायकवाड यांना दावेदार म्हटले जात आहे. पण बेन स्टोक्सला दुखापत झाली आहे. तसे, मोईन अली स्वतः देखील कर्णधार होऊ शकतो.

मोईन अलीने गेल्या वर्षी पाकिस्तान दौऱ्यावर इंग्लंड संघाची कमान सांभाळली होती. मोईन अलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ १७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. येथे त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर 7 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 4-3 ने पराभूत केले.

ऋतुराजच्या नावाचीदेखील जोरदार चर्चा सुरु आहे. आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक 635 ​​धावा केल्या. ऋतुराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे. अजिंक्य रहाणेदेखील आहे. IPL मध्ये T-20 चे नेतृत्व करण्याचा अनुभव रहाणेला आहे.

धोनीला दुखापतीची बाधा

चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यात बुधवारी 12 एप्रिल रोजी सामना पार पडला. चेन्नईचा या सामन्यात शेवटच्या बॉलवर पराभव झाला. यानंतर स्टीफन फ्लेमिंग याने धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली. धोनीला दुखापतीमुळे राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धावताना त्रास जाणवत होता. चेन्नईचा या सामन्यात पराभव तर झालाच. मात्र आता धोनीच्या या दुखापतीने टीम मॅनेजमेंटच टेन्शन वाढलंय.

धोनीला सामन्यादरम्यान धावताना अडचण येत होती. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यानेही धोनीच्या दुखापतीकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. धोनीला धावताना पाहून तो धोनी वाटत नाही, जो नेहमी दिसून येतो, असं म्हणत हेडनने धोनीला धावताना त्रास होत असल्याची शंका आपल्या बोलण्यातून व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.