IPL 2023 : एमएस धोनीच्या दुखापतीबद्दल कोचचे मोठे अपडेट! पहिल्या सामन्यात कर्णधार चालत होता लंगड्यात

 | MS Dhoni Injury | Cricket News in Marathi
| MS Dhoni Injury | Cricket News in Marathi
Updated on

IPL 2023 MS Dhoni Injury : गेल्या काही दिवसांपासून एमएस धोनीच्या फिटनेसबाबत चाहत्यांसाठी टेन्शन देणाऱ्या बातम्या येत आहे. आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी त्याच्याबद्दल बातमी आली होती की तो गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. सरावाच्या वेळी धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट केले होते. धोनी यानंतर गुजरातविरुद्ध मैदानात उतरला, मात्र सामन्यादरम्यान तो वेदनेत दिसला.

 | MS Dhoni Injury | Cricket News in Marathi
IPL 2023 : दुखापतींची साडेसाती, त्यात काही परदेशी खेळाडू घरी... पंजाब-कोलकता यांची सलामीलाच कसोटी

दीपक चहरच्या चेंडूवर राहुल तेवतियाचा फटका रोखण्यासाठी धोनीने डाईव्ह मारली, तो खाली पडताना त्याच गुडघ्यावर पडला, त्यात दुखापत झाल्याची बातमी आहे. खाली पडताच धोनी वेदनेत दिसला. आता CSK प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याच्या फिटनेसबद्दल एक मोठा अपडेट दिला आहे.

 | MS Dhoni Injury | Cricket News in Marathi
Ravi Shastri IPL 2023 : रवी शास्त्री पुन्हा गोंधळले; अजूनही WPL चाच हँगओव्हर

वेदनेत दिसला तरी धोनी खेळत राहिला. आता फ्लेमिंगने सांगितले की धोनीला गुडघ्यात क्रॅम्प आला होता. प्री-सीझनच्या संपूर्ण महिन्यात तो त्याच्या गुडघेदुखीवर काम करत होता, पण त्याला फक्त सामन्यादरम्यान क्रॅम्प आला होता. मात्र, असे असूनही धोनी पुढचा सामना खेळू शकणार नसल्याच्या बातम्या आहेत.

चेन्नईचा पुढचा सामना घरच्या मैदानावर 3 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. CSK विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागल्याने चेन्नईला लवकरच आपल्या कमकुवतपणावर मात करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()