RCB IPL 2023: RCB च्या विजयाने Playoffs चं गणित बिघडलं; रोहितसमोर 'विराट' संकट

RCB IPL 2023: विराटच्या दमदार खेळीमुळं मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं
IPL 2023 Mumbai Indians still qualify for the playoffs  Check what MI need to do
IPL 2023 Mumbai Indians still qualify for the playoffs Check what MI need to do
Updated on

RCB IPL 2023: सनराईजर्स हैदराबादच्या हेन्रिच क्लासेनने शतकी खेळी करत आरसीबसमोर 187 धावांचे मोठे आव्हान ठेवले.

मात्र, विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिसच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघावर 8 विकेट्सने दमदार विजय मिळवला. विराटच्या या दमदार खेळीमुळं मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं आहे. (IPL 2023 Mumbai Indians still qualify for the playoffs Check what MI need to do)

गुणतालिकेचा विचार केला तर आरसीबीने आजचा सामना जिंकून आपली गुणसंख्या 14 केली आहे. त्यांनी गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले असून मुंबई इंडियन्सला पाचव्या स्थानावर ढकलले आहे. त्यामुळे प्ले ऑफचं गणित चांगलच बिघडलं आहे. मात्र, आरसीबीचा प्लेऑफ्सचा मार्ग सुखकर झाला आहे.

IPL 2023 Mumbai Indians still qualify for the playoffs  Check what MI need to do
Virat Kohli SRH vs RCB : मी खूप तणावाखाली होतो आता मात्र बाहेरच्या... कोहलीने सामन्यानंतर दिले सडेतोड उत्तर

चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स दोन्ही संघ जास्तीत जास्त 17 गुणांपर्यंत झेप घेऊ शकतात. मुंबईला जास्तीत जास्त 16 गुण मिळवता येतील. हैदराबादविरुद्धच्या विजयामुळे 14 गुणांसहीत आरसीबीने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

आरसीबीचा नेट रनरेट 0.180 इतका आहे. तर मुंबईसुद्धा अंतिम सामना जिंकून 16 गुणांपर्यंत मजल मारु शकते. सध्या 14 गुण असले तरी नेट रन रेट -0.128 असल्याने ते आरसीबीच्या खाली आहेत. त्यामुळेच मुंबईला आपला शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.

IPL 2023 Mumbai Indians still qualify for the playoffs  Check what MI need to do
Virat Kohli IPL Records : टी 20 कारकीर्द संपल्याची चर्चा सुरू असतानाच विराट कोहलीनं इतिहास रचला

आरसीबीने त्यांचा गुजरात जायंट्सविरुद्धचा सामना अगदी 1 धावाने जिंकला तरी मुंबईला वानखेडेच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यात मोठा विजय आवश्यक असेल. हैदराबादविरुद्धचा शेवटचा सामना मुंबईला किमान 79 धावांनी जिंकावा लागेल.

असं झालं तरच मुंबई नेट रन रेटमध्ये आरसीबीच्या पुढे जाईल. या सर्व जर तर मध्ये आरसीबी साखळी फेरीमधील आपल्या शेवटचा सामना गुजरातविरुद्ध खेळणार असल्याने किती मोठा विजय मिळवायचा आणि प्लेऑफ्ससाठी स्थान निश्चित कसं करायचं हे सगळं आता विराटच्या हातात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.