IPL 2023 Naveen Ul Haq Celebration Reaction Rohit Sharma : यंदाच्या आयपीएलमधील रंगत आणखी वाढताना दिसत आहे. कालच्या सामन्यात मुंबईनं लखनौला पराभवाची धुळ चारली. यानंतर आता मुंबई आणि गुजरात टायटन्सचा सामना होणार आहे. लखनौचा वेगवान गोलंदाज यासगळ्यात चर्चेत आला आहे. त्यानं रोहित शर्माची घेतलेली विकेट आनंद व्यक्त केलेला आनंद त्यावर भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेली कालची मॅच म्हणावी इतकी अटीतटीची झाली नाही. लखनौनं तर सुरुवात चांगली केली होती. मात्र त्यानंतर त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. दरम्यान मुंबईनं पहिल्यांदा फलंदाजीला येऊन चांगली धावसंख्या उभारली होती. त्यात लखनौचा गोलंदाज नवीन उल हकची चर्चा होत आहे.
Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!
नवीन उल हकनं मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला आऊट केले. त्यानंतर ज्याप्रकारे आनंद व्यक्त केला त्याची सोशल मीडियावर होत आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवीन उल हकवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. त्यावर आता भारताचे माजी प्रसिद्ध फलंदाज सुनील गावसकर यांनी नवीन उल हकची फिरकी घेतली आहे. त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याची चर्चा होताना दिसते आहे.
गावसकर म्हणाले, त्यानं रोहित शर्मा आऊट होताच कानात बोट घालून आनंद व्यक्त केला. मला त्याची ती स्टाईल काही समजली नाही. त्याला नेमकं काय म्हणायचे होते. एवढी मोठी विकेट मिळाल्यानंतर अशा प्रकारे आनंद व्यक्त करतं का, त्याला गर्दीपासून काही त्रास होता का हे मला जाणून घ्यायचे आहे. जेव्हा तुम्हाला विकेट मिळते तेव्हा दर्शकांकडुन जी टाळ्यांची दाद मिळते ती तुम्ही ऐकायला हवी. असे गावसकरांनी म्हटले आहे.
तुम्ही तुमचे कान बंद करु नका. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज ऐका. लोकं काय म्हणतात हे ऐका असेही गावसकरांनी म्हटले आहे.नवीन उल हकनं रोहित शर्माच्या विकेटनंतर जेव्हा सुर्यकुमार यादव आणि कॅमेरुन ग्रीनची विकेट घेतल्यानंतर देखील अशाच प्रकारे आनंद व्यक्त केला. ज्यामुळे त्याच्या नावाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.