आयपीएल २०२३ मध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांनंतर पॉइंट टेबलसह ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत बरेच फेरबदल झाले आहेत. ऑरेंज कॅपनं दिवसभरात तीन डोकी बदलली. आधी CSK च्या ऋतुराजकडे ऑरेंज कॅप होती. दिवसाचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. पहिला राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने ७९ धावांची दमदार खेळी करत ऋतुराज गायकवाडकडून ऑरेंज कॅप हिसकावून घेतली.
यानंतर थोड्याच वेळात दुसऱ्या डावात डीसीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६५ धावांची इनिंग खेळून ऑरेंज कॅपवर ताबा मिळवला. मात्र डेव्हिड वॉर्नरला फार काळ ऑरेंज कॅपवर ताबा मिळवता आला नाही.
कारण जेव्हा ऋतुराज गायकवाडने दुसऱ्या सामन्यात मुंबई विरूद्ध नाबाद ४० धावा केल्या, तेव्हा तो पुन्हा एकदा IPL 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल ठरला आणि दिवसाच्या अखेरीस ऑरेंज कॅप त्याच्यापर्यंत पोहोचली.अशा प्रकारे ऑरेंज कॅपने एकाच दिवसात तीन डोकी बदलली.
आयपीएल २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड १८९ धावांसह आघाडीवर आहे. तसेच डेव्हिड वॉर्नर, जोस बटलर, काइल मेयर्स आणि शिखर धवन टॉप ५ मध्ये आहेत.याशिवाय यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा आणि विराट कोहली हे आणखी तीन फलंदाज आहेत ज्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.