IPL 2023: धोनीच्या कर्णधारपद सोडण्याच्या चर्चावर विमानात मोठी अनाउन्समेंट! पायलट म्हणाला...

चाहते आणि अनेक क्रिकेट तज्ज्ञ धोनीकडे करत आहे मागणी...
MS Dhoni IPL 2023
MS Dhoni IPL 2023sakal
Updated on

MS Dhoni IPL 2023 : आयपीएल 2023 मधील पहिला सामना गमावल्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने शानदार पुनरागमन केले आहे. पुढील दोन सामने जिंकून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.

धोनीने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये आपल्या कर्णधारपदाची आणि फलंदाजीची छाप पाडली आहे. धोनी या मोसमात CSK चे नेतृत्व करत आहे पण पुढच्या मोसमातही तो कर्णधार असेल की नाही हे निश्चित झालेले नाही. पुढच्या हंगामात त्याचे खेळणे देखील निश्चित झालेले नाही.

MS Dhoni IPL 2023
IPL 2023: 'देवा कोठे तोंड लपू...' चेन्नईविरुद्ध पराभवानंतर रोहितला काय झालं?

चाहते आणि अनेक क्रिकेट तज्ज्ञ धोनीकडे मागणी करत आहेत की त्याने CSK चे कर्णधारपद सोडू नये आणि आता IPL मधून निवृत्ती घेऊ नये. मात्र याचदरम्यान एका पायलटनेही धोनीला असेच आवाहन केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. वास्तविक मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी ही घटना त्याच फ्लाइटची आहे ज्याने CSK टीम मुंबईला जात होती.

या फ्लाइटमध्ये धोनीही उपस्थित होता आणि माहीला त्या फ्लाइटमध्ये बसलेले पाहून पायलटला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने धोनीबाबत खास घोषणा केली. ही घोषणा करताना धोनीच्या या चाहत्याने धोनीला CSK चे कर्णधारपद सोडू नका असे सांगितले.

व्हायरल व्हिडीओमध्ये पायलट म्हणतो की, 'मला आनंद आहे की CSK टीम आमच्या फ्लाइटमध्ये प्रवास करत आहे. मी धोनीला सीएसकेचा कर्णधार म्हणून पुढे जाण्याची विनंती करतो.

फ्लाइटमध्ये बसलेल्या प्रवाशांनी या पायलटची घोषणा त्यांच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सध्या या पायलटने धोनीला जे आवाहन केले, तेच आवाहनही संपूर्ण देश धोनीला करत आहे की, या सीझननंतर त्याने अलविदा करू नका. मात्र धोनी काय निर्णय घेणार हे फक्त त्यालाच माहीत आहे. त्यामुळे सध्या आपण फक्त प्रतीक्षा करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.