IPL 2023 Playoff Scenario: 7 सामने पूर्ण... 7 बाकी, 4 पराभवानंतर मुंबईसाठी प्लेऑफचा रस्ता असेल कसा?

महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023 च्या अर्ध्या प्रवासानंतर गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे.
IPL 2023 Playoff Scenario
IPL 2023 Playoff Scenario
Updated on

IPL 2023 Playoff Scenario : आयपीएल 2023चा अर्धा प्रवास पूर्ण झाला आहे. एकूण 70 सामन्यांपैकी 35 सामने खेळले गेले आहेत. म्हणजे ग्रुप स्टेजमध्ये 14 सामन्यांपैकी सर्व 10 संघांनी अर्धे सामने खेळले आहेत. आता ग्रुप स्टेजमध्ये 7 सामने खेळायचे बाकी आहेत. अशा परिस्थितीत गुणतालिकेची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023 च्या अर्ध्या प्रवासानंतर गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. त्याच्यानंतर हार्दिक पांड्याचा संघ गुजरात टायटन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनीही अव्वल चार संघांमध्ये स्थान राखले आहे.

IPL 2023 Playoff Scenario
GT vs MI IPL 2023 : हार्दिक रोहितवर पडला भारी, गुजरातनं पहिल्यांदाच मुंबईला पाजलं पाणी

आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये तोच संघ पोहोचतो जो गुणतालिकेत पहिल्या 4 मध्ये आहे. या दृष्टिकोनातून, सध्या चेन्नई, गुजरात, राजस्थान आणि लखनौ आघाडीवर आहेत. चेन्नई आणि गुजरातने 7 पैकी 5-5 सामने जिंकले असून त्यांचे केवळ 10 गुण आहेत. पण चांगल्या रनरेटमुळे CSK पहिल्या क्रमांकावर आहे तर GT दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिस-या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान आणि लखनौच्या संघांचीही तीच स्थिती आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या 7-7 सामन्यांपैकी 4-4 जिंकले असून त्यांचे 8 गुण आहेत. पण उत्तम रन रेटमुळे RR हा LSG पेक्षा वरचा आहे.

IPL 2023 Playoff Scenario
GT vs MI IPL 2023 : गुजरातने मुंबईला चारली पराभवाची धूळ

आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत 5 आणि 6 व्या क्रमांकावर बसलेल्या RCB आणि पंजाब किंग्जचेही केवळ 8-8 गुण आहेत. म्हणजे त्यांनी पहिल्या 7 पैकी फक्त 4-4 सामने जिंकले आहेत पण फरक रनरेटच्या बाबतीत आहे.

या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक असून त्याचा परिणाम गुणतालिकेत पण दिसून येत आहे. 7 पैकी फक्त 3 सामने जिंकून हा संघ 7 व्या क्रमांकावर आहे. याशिवाय 8, 9 आणि 10 व्या क्रमांकावर बसलेल्या कोलकाता, हैदराबाद आणि दिल्लीचे 7 सामने खेळून केवळ 4-4 गुण आहेत.

प्लेऑफच्या शर्यतीत पुढे काय?

चेन्नई आणि गुजरात हे सध्या अव्वल दोन संघ आहेत. त्यांना 10-10 गुण आहेत. म्हणजे त्यांनी पुढील 7 पैकी 3 किंवा 4 सामने जिंकले तर 16 किंवा 18 गुणांसह ते प्लेऑफचे तिकीट मिळू शकते.

याप्रमाणे तिसऱ्या क्रमांकापासून सहाव्या क्रमांकापर्यंतच्या संघांना किमान 4 किंवा 5 सामने जिंकावे लागतील. येथेही प्रश्न रनरेटचा असल्याने अधिकाधिक सामने जिंकून विजयाचे अंतर लक्षात घेऊन प्रयत्न करावे लागणार आहेत.

सातव्या ते 10 व्या क्रमांकापर्यंत संघांसाठी एक प्रकारे हरणे निषिद्ध असेल. कारण या विचाराने खेळला तरच तो प्लेऑफमध्ये पोहोचताना दिसतो. अन्यथा त्यांच्या सध्याच्या स्थितीवरून त्यांच्यासाठी प्लेऑफचे तिकीट दूरचे वाटते. त्यात मुंबई इंडियन्स पण येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.