IPL 2023 Playoffs Scenario: लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित शर्माची मुंबई प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर? समजून घ्या समीकरण

लखनऊचा विजय आणि मुंबईच्या पराभवानंतर प्लेऑफचे समीकरण पूर्णपणे बदले...
 ipl 2023 playoffs scenario
ipl 2023 playoffs scenario
Updated on

IPL 2023 Playoffs Scenario Points Table : लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 धावांनी दणदणीत विजय मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहे. 13 साखळी सामन्यांत 7 विजय मिळविल्यानंतर लखनऊ आता 15 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आता जर त्यांनी शेवटचा साखळी सामना जिंकला तर त्यांचे प्लेऑफमधील स्थान पूर्णपणे निश्चित मानले जाईल. लखनऊ संघाचा सध्या निव्वळ धावगती 0.304 आहे.

 ipl 2023 playoffs scenario
LSG vs MI: प्ले-ऑफची शर्यत रंजक! शेवटच्या षटकात लखनऊने मुंबईच्या तोंडचा घास घेतला हिरावून

या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित शर्माची मुंबई इंडियन्सची प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली का? हा सर्वात मोठा प्रश्न पडतो. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या पराभवाने मुंबई इंडियन्स नक्कीच मोठे नुकसान झाले आहे. आता संघ 13 सामन्यांनंतर 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आता जर मुंबईला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले तर ते प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर होतील हे मात्र नक्की आहे.

 ipl 2023 playoffs scenario
LSG vs MI: रोमांचक सामन्यात लखनऊने मुंबईचा 5 धावांनी केला पराभव! प्ले-ऑफच्या दिशेने उचलले पाऊल

सध्या गुणतालिकेत 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी शेवटचा साखळी सामना जिंकणे आवश्यक आहे. चेन्नई सुपर किंग्जला 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यापासून वंचित राहू शकतात.

लखनऊच्या मुंबईविरुद्धच्या विजयानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्लेऑफचा रस्ता थोडा कठीण झाला आहे. सध्या RCB 12 सामन्यांत 6 विजय आणि 6 पराभवांसह गुणतालिकेत 5 व्या स्थानावर आहे. संघाला अजून 2 साखळी सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यानंतर ते प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करू शकतात. मात्र त्यांना पंजाब आणि मुंबईच्या पुढील सामन्यातील पराभवाची वाट पहावी लागेल.

 ipl 2023 playoffs scenario
LSG vs MI: लखनऊचा कर्णधार कृणाल पांड्या आऊट झाला नाही तर... 49 धावांवर गेला पॅव्हेलियनमध्ये!

पंजाब किंग्जचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. पंजाब सध्या 12 सामन्यांत 6 विजयांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. जर पंजाबने त्यांचे शेवटचे 2 साखळी सामने जिंकले तर त्यांचे 16 गुण पूर्ण होतील. अशा परिस्थितीत ते प्लेऑफसाठी त्यांचे स्थान निश्चित करू शकतात. मात्र त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे.

गेल्या मोसमात अंतिम फेरीत पोहोचलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे खूप कठीण दिसत आहे. राजस्थानचे सध्या 13 सामन्यांत 12 गुण आहेत आणि शेवटचा सामना जिंकल्यानंतर त्यांना केवळ 14 गुणांपर्यंतच मजल मारता येईल. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सचीही अशीच स्थिती आहे, ज्यांचे 13 सामन्यांनंतरही 12 गुण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.