IPL 2023 Playoffs Scenario: पंजाबच्या पराभवाने या दोन संघांचा मार्ग मोकळा! प्ले-ऑफचे समीकरण झाले स्पष्ट

पंजाबच्या पराभवानंतर आयपीएल 2023 चे प्लेऑफ समीकरण झाले स्पष्ट...
IPL 2023 Playoffs Scenario
IPL 2023 Playoffs Scenario
Updated on

IPL 2023 Playoffs Scenario : आयपीएलच्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ आज पंजाब किंग्जसमोर होता. या सामन्यात दिल्ली संघाने 15 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 213 धावा ठोकल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब संघाला 8 गडी गमावून 198 धावा करता आल्या.

पंजाबच्या या पराभवानंतर आता त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. त्याच वेळी RCB आणि इतर अनेक संघांना टॉप-4 मध्ये पोहोचण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

IPL 2023 Playoffs Scenario
PBKS vs DC Liam Livingstone : दोन गुणांसाठी लिव्हिंगस्टोन शेवटपर्यंत भिडला, मात्र अखेर दिल्लीने तळ सोडलाच

दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर पंजाब संघाची शक्यता फारच कमी आहे. पंजाबचे आता 13 सामन्यांतून 12 गुण झाले आहेत आणि त्याचा नेट रन रेट -0.308 आहे. पंजाब लीग टेबलमध्ये 8 व्या क्रमांकावर आहे. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबला पुढील सामन्यात मोठा विजय मिळवावा लागेल तसेच इतर संघ त्यांचे सर्व सामने हरतील हे पाहावे लागेल.

त्याचबरोबर या पराभवाचा आरसीबीला मोठा फायदा होणार आहे. आरसीबीचे अजून 2 सामने बाकी असून त्यांचे गुणही 12 आहेत. येथून हा संघ जिंकून 16 गुणांसह पात्र ठरू शकतो. RCB चा नेट रन रेट देखील 0.166 आहे. अशा परिस्थितीत आरसीबीकडे आता सर्वोत्तम संधी आहे. दुसरीकडे राजस्थान, केकेआरचेही 13 सामन्यांतून 12 गुण आहेत आणि त्यांनाही प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतर संघांच्या पराभवावर अवलंबून राहावे लागेल.

IPL 2023 Playoffs Scenario
Rilee Rossouw PBKS vs DC : पृथ्वी, वॉर्नरची अर्धशतके तर रूसोने पंजाबला दिले तडाखे, प्ले ऑफचा मार्ग केला खडतर

याशिवाय गेल्या सामन्यात मुंबईवर विजय मिळविल्यानंतर लखनऊ संघाचे 13 सामन्यांत 15 गुण झाले असून हा संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा संघ 13 सामन्यांत 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. आता या दोन्ही संघांचा एक सामना बाकी आहे. लखनऊने त्यांचा पुढील सामना जिंकल्यास त्यांचे प्लेऑफचे स्थान निश्चित होईल.

दुसरीकडे, मुंबई संघाने पुढील सामना जिंकल्यास त्यांचे 16 गुण होतील आणि हे प्रकरण निव्वळ रनरेटवरही अडकू शकते. मुंबईचा धावगती सध्या -0.128 आहे. अखेर चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि आरसीबी यांच्यात चुरशीची लढत होऊ शकते.

या व्यतिरिक्त आणखी एक संघ ज्याला पात्र ठरण्याची मोठी संधी आहे तो म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. CSK चे 13 सामन्यांतून 15 गुण झाले असून हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पात्र होण्यासाठी आता CSK ला त्यांचा पुढील सामना जिंकणे आवश्यक आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्स आणि केकेआरच्या सर्व आशा इतर संघांच्या पराभवावर असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()