IPL 2023 Playoffs Scenario : दिल्ली कॅपिटल्सने वाढवली धोनीची चिंता! CSK प्ले-ऑफमधून बाहेर?

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर प्लेऑफची शर्यत अधिक रोमांचक बनली...
ipl 2023-playoffs-scenario-more-trouble-for ms dhoni-lead-csk-after-dc-win-against-pbks cricket news
ipl 2023-playoffs-scenario-more-trouble-for ms dhoni-lead-csk-after-dc-win-against-pbks cricket news
Updated on

IPL 2023 Playoffs Scenario : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामात बुधवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर प्लेऑफची शर्यत अधिक रोमांचक बनली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, पण त्यामुळे इतर संघांची चिंता वाढली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या कामगिरीचा सर्वात मोठा धोका धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी 20 मे रोजी होणार आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्ज 13 सामन्यांत 15 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पण सीएसकेचे प्लेऑफचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. तथापि CSK दिल्लीविरुद्ध जिंकल्यास त्याचे प्लेऑफचे तिकीट निश्चित होईल.

ipl 2023-playoffs-scenario-more-trouble-for ms dhoni-lead-csk-after-dc-win-against-pbks cricket news
IPL 2023 Playoffs Scenario: पंजाबच्या पराभवाने या दोन संघांचा मार्ग मोकळा! प्ले-ऑफचे समीकरण झाले स्पष्ट

पण दिल्लीविरुद्धचा पराभव झाल्यास सीएसकेचा प्रवास ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात येऊ शकतो. दिल्लीने सीएसकेला पराभूत केले तर त्याचा थेट फायदा लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला होईल. हे तिन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स सध्या 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शेवटचा सामना जिंकल्यास, लखनऊला गुणतालिकेत दुसरे स्थान मिळेल आणि त्याचे प्लेऑफचे स्थान निश्चित होईल. लखनऊचा पराभव झाला तरी तो नेट रन रेटच्या आधारे CSK ला स्पर्धा देऊ शकतो.

ipl 2023-playoffs-scenario-more-trouble-for ms dhoni-lead-csk-after-dc-win-against-pbks cricket news
IPL 2023: प्लेऑफमधून जवळपास बाहेर पडल्यानंतर पंजाबच्या कर्णधाराचा संतापला, म्हणाला...

आरसीबी आणि मुंबई इंडियन्स 12-14 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. आरसीबी चे दोन सामने बाकी आहेत. आज सनरायझर्स हैदराबाद आणि शेवटचा सामना गुजरात टायटन्सशी आहे. हे दोन्ही सामने जिंकून आरसीबी प्ले-ऑफचे तिकीट मिळवू शकते. दुसरीकडे ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असेल. मुंबई जिंकली तर प्ले ऑफमध्ये खेळणे निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.