MS Dhoni IPL 2023 : राजस्थान रॉयल्स विरुद्ध का पराभव झाला ? कर्णधार धोनीने सांगितली कारणे

डावाच्या मध्यावर धावांचा वेग वाढवायला हवा होता!
mahendra singh dhoni
mahendra singh dhoni mahendra singh dhoni
Updated on

चेन्नई : डावाच्या मध्यावरची काहीशी संथ फलंदाजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवास कारणीभूत ठरली, असे विश्लेषण चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने केले आहे.

राजस्थानविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नईचा अवघ्या तीन धावांनी पराभव झाला. यात धोनीने स्वतः १७ चेंडूत नाबाद ३२ धावांची खेळी केली, परंतु तो अखेरच्या चेंडूवर षटकार मारू शकला नाही.

राजस्थानने प्रथम फलंदाजीत ७ बाद १७५ धावा केल्या होत्या. या आव्हानासमोर चेन्नईचा संघ फलंदाजी करत असताना सामन्याचे भवितव्य ७ ते १५ या षटकांत निश्चित झाले. यात डेव्हन कॉनवे (३८ चेंडूत ५०), शिवम दुबे (९ चेंडूत ८) आणि मोईन अली (१० चेंडूत ७) यांना अपेक्षेनुसार धावांची गती वाढवता आली नाही.

या मधल्या षटकांत अश्विन (२५ धावांत २) आणि युझवेंद्र चहल(२७ धावांत २) टिच्चून गोलंदाजी केली.फिरकी गोलंदाजांना फार सहाय्य मिळत नव्हते, तरीही आमचे फलंदाज या मधल्या षटकांत अधिक निर्धाव चेंडू खेळले.

खेळपट्टीवर चेंडू अधिक फिरक घेत असतो किंवा उडत असतो अशा वेळी चेंडू पारखून खेळणे समजू शकतो, परंतु तसे काहीच घडत नसताना अशा प्रकारची फलंदाजी चिंता करणारी आहे, अशी निराशा धोनीने सामन्यानंतर व्यक्त केली.

mahendra singh dhoni
MS Dhoni IPL 2023: कोचच्या खुलाशाने CSK मध्ये खळबळ! धोनी पुढील सामन्यातुन बाहेर?

रवींद्र जडेजा आणि मी अखेरचे प्रमुख फलंदाज होतो, त्यामुळे आम्हाला विचार करून खेळावे लागले. अशा प्रकारच्या स्पर्धांत सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धावांच्या सरासरीचा (नेट रनरेट) विचार केला जात नसतो, परंतु सामने जिंकण्यासाठी निश्चितच धावांच्या गतीवर लक्ष ठेवावे लागते.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आम्ही डावाच्या मध्यावर एकेरी-दुहेरी धावा काढू शकलो नाही आणि अशा प्रकारे दडपण वाढवल्यानंतर पुढचे फलंदाज लगेचच मोठे फटके मारू शकत नाहीत, असे धोनीने सांगितले.

विजयासाठी प्रयत्न करताना धोनीने तीन षटकार मारले, याबाबत विचारले असता तो म्हणाला, गोलंदाज चुका करण्याची मी वाट पाहत होतो.

अशा स्थितीत मी विचारपूर्वक फटके निवडतो. अखेरचे षटक असल्याने गोलंदाजावरही दडपण असते. अशा वेळी आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून फटके मारायचे असतात.

mahendra singh dhoni
IPL सुरू असतानाच पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या; मुंबई कोर्टाने दिले आदेश

मैदानावर मोठ्या प्रमाणात दव पडले होते, त्यामुळे गोलंदाजी करणे कठीण असते. तरीही या संधीचा फायदा आमचे गोलंदाज घेऊ शकले नाहीत, अशी खंत व्यक्त करताना धोनी म्हणतो, पहिल्या सहा षटकांचा खेळ झाल्यानंतर मैदानावर पडलेल्या दवामुळे फलंदाजी करणे सोपे झाले होते. त्यामुळे गोलंदाजांवर दडपण टाकून फटकेबाजी करता आली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.