RCB IPL 2023 : बंगळूरचे विजयाच्या हॅट्‌ट्रिकचे लक्ष तर कोलकत्याला टाळायचाय सहावा पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आज आयपीएलची लढत बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.
Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders
Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders
Updated on

Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आज आयपीएलची लढत बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाने मागील दोन लढतींत पंजाब किंग्स व राजस्थान रॉयल्सला पराभूत केल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला असेल.

आता त्यांचे लक्ष्य विजयाची हॅट्‌ट्रिकचे असेल. कोलकता नाईट रायडर्सला सलग पाचवा तर एकूण सहावा पराभव टाळावा लागणार आहे. मागील चारही लढतींमध्ये त्यांच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली आहे.

Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders
IPL 2023 Playoff Scenario: 7 सामने पूर्ण... 7 बाकी, 4 पराभवानंतर मुंबईसाठी प्लेऑफचा रस्ता असेल कसा?

बंगळूरने आतापर्यंत झालेल्या सात लढतींपैकी चारमध्ये विजय मिळवला आहे. पहिल्या तीन क्रमांकावरील फलंदाजांनी धडाकेबाज खेळ केल्यामुळे त्यांना हे शक्य झाले आहे.

कर्णधार फाफ ड्युप्लेसी (४०५ धावा), विराट कोहली (२७९ धावा) व ग्लेन मॅक्सवेल (२५३ धावा) यांनी बंगळूरचा फलंदाजी विभाग स्वत:च्या खांद्यावर घेतला आहे.

मात्र प्रत्येक लढतींमध्ये या तीनच फलंदाजांवर अवलंबून राहून चालणार नाही. दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, सुयश प्रभूदेसाई व शाहबाज अहमद या मधल्या फळीतील फलंदाजांनीही जबाबदारी स्वीकारायला हवी.

Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders
IPL News : हार्दिक पंड्याच्या सेनेचा हा पाचवा विजय

बंगळूर संघाने गोलंदाजी विभागातही चमकदार कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सात सामन्यांमधून १३ विकेट घेत आपली चुणूक दाखवली आहे. या दरम्यान त्याने फक्त ७.१७च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

हर्षल पटेलने १० विकेट टिपले असून वेन पार्नेलने ६ विकेट घेतले आहेत. दोघेही सिराजला साथ देत आहेत. मात्र हर्षलकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. वनिंदू हसरंगा याच्या पुनरागमनाचा फायदा बंगळूरला झाला आहे.

कोलकता संघाला पहिल्या सातपैकी दोनच लढतींमध्ये विजय मिळवता आला आहे. श्रेयस अय्यर व शाकीब उल हसन या दोन प्रमुख खेळाडूंनी यंदाच्या मोसमातून विविध कारणांनी माघार घेतली आहे. पण कोलकता संघाला या दोन खेळाडूंची अनुपस्थिती जाणवते आहे.

Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders
GT vs MI IPL 2023 : हार्दिक रोहितवर पडला भारी, गुजरातनं पहिल्यांदाच मुंबईला पाजलं पाणी

दोन वेळा विजेत्या ठरलेल्या कोलकता संघाला यंदाच्या मोसमात फलंदाजांचे अपयश जास्त बोचणी देणारे ठरत आहे. कर्णधार नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, एन. जगदीशन यांच्याकडून निराशा झाली आहे.

तसेच संघ व्यवस्थापनाकडूनही सलामीवीरांसाठीही सातत्याने बदल करताना दिसण्यात येत आहे. सुनील नारायण, जगदीशन, लिटन दास, जेसन रॉय व रहमानुल्लाह गुरबाज यांना सलामीला फलंदाजीला पाठवण्यात आले. एका जोडीवर त्यांचा संघ स्थिर राहत नाही. याचा फटकाही त्यांना बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.