RCB IPL 2023: हर्षलची एक चूक RCB ला महागात पडली; १६ कोटींच्या खेळाडूमुळे लखनौचे नशीब पालटले

लखनौ सुपर जायंट्सने दमदार लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका विकेटने पराभव केला.
RCB IPL 2023
RCB IPL 2023
Updated on

RCB News: लखनौ सुपर जायंट्सने दमदार लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका विकेटने पराभव केला. प्रत्येक क्षणाला बदलणाऱ्या सामन्यात रवी बिश्नोई आणि आवेश खान या जोडीने एक धाव घेतली अन् लखनौच्या शाही विजयावर शिक्कामोर्तब केले.(RCB vs LSG Why Harshal Patel run out appeal at non striker end was turned down )

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून मिळालेल्या 213 धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनौ सुपर जायंटस् संघाने 20व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर एक विकेट राखून रोमहर्षक विजय मिळवला. हा थरारक सामना यंदाच्या सीझनमधील अविस्मरणीय ठरला.

हर्षलची एक चूक RCB ला महागात पडली

सामन्यातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी हर्षल पटेल मैदानात होता. शेवटच्या चेंडूपूर्वी कर्णधार फॅफ आणि गोलंदाज यांच्यात चर्चा झाली. यानंतर हर्षल गोलंदाजी करायला गेला.

यावेळी रवी बिष्णोई नॉन स्ट्राइकवर होता, तर आवेश खान स्ट्राइकवर होता. त्यावेळी आरसीबीच्या हर्षलने हुशारी दाखवत बिष्णोईला मंकडिंग करण्याचा प्रयत्न केला.

RCB IPL 2023
RCB vs LSG: थरार सामन्यानंतर दोन्ही संघ अडचणीत, अखेच्या क्षणी काय झालं?

पण त्याचा हा डाव फसला. पहिल्याच प्रयत्नात त्याचा चेंडू स्टंपला लागून सुटला, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने थ्रो टाकून बिश्नोईला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, चेंडूही स्टंपला लागला.

आऊटचे अपील अंपायरने फेटाळले. हा प्रकार घडल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांना प्रश्न पडला होता की शेवटी बिश्नोईसाठी अंपायर तिसऱ्या पंचाकडे का गेले नाहीत.

म्हणून बिष्णोईला आऊट दिले नाही

MCC च्या नियम 38.3.1.2 नुसार, जर नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाने क्रीझ सोडली असेल, आणि ते सुद्धा जेव्हा गोलंदाजाने त्याची क्रिया पूर्ण केली असेल आणि तो चेंडू फेकण्याच्या रिलीझ पॉइंटपर्यंत पोहोचला असेल, तर गोलंदाज नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाला धावबाद करू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.