IPL 2023 : रोहित शर्माचा फ्लॉप शो अन् सुनील गावसकर यांना लागली WTC Final ची चिंता! म्हणाले आता...

सुनिल गावस्करांचा हिटमॅनला मोलाचा सल्ला
Sunil Gavaskar on Rohit Sharma
Sunil Gavaskar on Rohit Sharma
Updated on

Sunil Gavaskar on Rohit Sharma : रोहित शर्मासाठी आयपीएल 2023 आजुन तरी काहीही चांगले राहिली नाही. 16व्या हंगामाच्या अर्ध्या प्रवासात ना त्याची फलंदाजी दिसली ना कर्णधार.

त्याची कामगिरी पाहिल्यानंतर आता लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी त्याला मोठा सल्ला दिला आहे. गुजरात आणि मुंबई सामना संपल्यानंतर प्रक्षेपण वाहिनीवर रोहित शर्माचे विश्लेषण करत असताना सुनील गावसकर यांनी रोहित शर्माबद्दल बोलले. गुजरात विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी दारूण पराभव झाला होता. (Latest Sport News)

Sunil Gavaskar on Rohit Sharma
Team India: BCCIने सुधारली मोठी चूक! अचानक एक वर्षानंतर या घातक गोलंदाजाची संघात एंट्री

मुंबई इंडियन्सचा पराभव आणि रोहित शर्माचा फ्लॉप शो पाहून सुनील गावसकर दुखावले गेले. अशा परिस्थितीत रोहित शर्माबद्दल गावसकर म्हणाले की, त्याने आता आयपीएलमधून ब्रेक घ्यावा, जेणेकरून तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी तंदुरुस्त राहू शकेल.

या चर्चेदरम्यान गावसकर यांनी रोहितच्या संपूर्ण हंगामातून ब्रेक घेण्याबाबत काहीही बोलले नाही. त्याने फक्त काही सामन्यांपासून दूर राहण्यास सांगितले.

Sunil Gavaskar on Rohit Sharma
IPL News : पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यात अपयश!

आयपीएल 2023 च्या अर्ध्या टप्प्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची अवस्था खराब आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत.

म्हणजेच त्यांना 4 सामने गमवावे लागले आहेत. त्याचवेळी रोहित शर्माच्या फलंदाजीची अवस्थाही बिकट आहे. कर्णधार रोहितने मुंबईकडून खेळल्या गेलेल्या IPL 2023 च्या पहिल्या 7 सामन्यांमध्ये फक्त 134 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचे 1 अर्धशतक आहे.

Sunil Gavaskar on Rohit Sharma
IPL 2023 Playoff Scenario: 7 सामने पूर्ण... 7 बाकी, 4 पराभवानंतर मुंबईसाठी प्लेऑफचा रस्ता असेल कसा?

रोहितच्या या कामगिरीवर गावसकर खूश नसतील. पण त्याची चिंता त्याचा फॉर्म किंवा कामगिरी नसून त्याच्या फिटनेसची आहे, ज्यासाठी त्याने त्याला आयपीएलमधून ब्रेक घेण्यास सांगितले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या जाणार आहे, ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील. भारताने WTC फायनलसाठी आपला १५ सदस्यीय संघ निवडला आहे, ज्याची कमान रोहित शर्माच्या हाती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.