Sandip Sharma twitted: IPL 2023 चा १७ वा सामना बुधवारी चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. हा सामना चांगलाच गाजला तो धोनी आणि संदीप शर्मा या गोलंदाजामुळे. शर्माने जगातील सर्वात मोठ्या मॅच फिनिशरला मॅच जिंकू दिली नाही.
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सीएसकेला तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या दोन षटकात सीएसकेला विजयासाठी ४० धावांची गरज होती. रवींद्र जडेजा एमएस धोनीसोबत क्रीजवर होता. दोघांनी १९व्या षटकात १९ धावा केल्या. त्यानंतर ६ चेंडूत २१ धावांची गजर होती.
संदीप शर्माला शेवटचे षटक टाकण्याची संधी मिळाली. समोर धोनी आणि जडेजासारखे दिग्गज होते. विशेषतः धोनी, जो जगातील सर्वोत्तम फिनिशर मानला जातो. अशा परिस्थितीत धोनीने संदिपला दोन षटकार ठोकले.
सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. शेवटी CSK ला १ बॉल ५ धावांची गरज होती. स्ट्राईकवर होता महारथी धोनी मात्र संदीपने अचूक यॉर्कर टाकत माहीला षटकार मारु दिला नाही आणि राजस्थान रॉयल्सने तीन धावांनी विजय मिळवला.
दरम्यान सामन्यानंतर संदीपने एक ट्विट केले. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. "माही पाजीचे २००व्या आयपीएल सामन्यासाठी अभिनंदन. त्याच्यासोबत क्षेत्ररक्षण करणे आणि त्याला गोलंदाजी करणे हा माझा सन्मान आहे. मी नेहमी कृतज्ञ राहील," असे संदिप म्हणाला.
धोनी या सामन्यात २००व्यांदा सीएसकेचा कर्णधार म्हणून उतरला होता. कोणत्याही एका फ्रँचायझी संघासाठी २०० वेळा आयपीएलचे नेतृत्व करणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे.
संदीप शर्माने पहिल्या तीन चेंडूंमध्ये दोन वाईड चेंडू टाकले होते आणि दोन षटकारही मारले होते. त्यानंतर सीएसकेला तीन चेंडूत सात धावांची गरज होती.
हा सामना सीएसके जिंकेल असे वाटत होते, पण त्यानंतर संदीपने जोरदार पुनरागमन केले आणि शेवटच्या तीन चेंडूत अवघ्या तीन धावा देत राजस्थान रॉयल्सला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.