Shubman Gill Sister Trolling : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील नुकत्याच झालेल्या गुजरात टायटन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात गुजरातच्या शुभमन गिलने दमदार शतक ठोकत गुजरातला विजय मिळवून दिला. मात्र आरसीबीचा पराभव झाल्यानंतर आरसीबीचे चाहते नाराज झाले. आरसीबी पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्यापासून दूर राहिल्यामुळे रागात चाहत्यांनी शुभमन गिलच्या बहिणीला अभद्र भाषेत ट्रोल करण्यास सुरूवात केली.
या प्रकरणी आता दिल्ली महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणी ज्या ट्रोलर्सनी शुभमन गिलच्या बहिणीला बलात्काराच्या धमक्या दिल्या त्या ट्रोलर्सविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची नोटिस पाठवली आहे. या नोटिसमध्ये म्हटले आहे की, 'शुभमन गिलच्या बहिणीबदद्ल ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अत्यंत अभद्र, आक्षेपार्ह, स्त्रीद्वेष आणि धमकी देणारी भाषा वापरण्यात आली आहे. तिला बलात्कार आणि हल्ला करण्याच्या देखील धमक्या सोशल मीडियावरून देण्यात आल्या आहेत. हा नक्कीच गुन्हा आहे.'
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी ट्विट केले की, 'शुभमन गिलच्या बहिणीविरूद्ध करण्यात आलेल्या ऑनलाईन ट्रोलिंगची आम्ही दखल घेतली आहे. आम्ही या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी दिल्ली पोलिसांना नोटिस पाठवली आहे. पोलिसांना 26 मे रोजी या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट द्यायचा आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारांना मोकळं सोडता कामा नये.'
दिल्ली महिला आयोगाने या नोटिसद्वारे एफआयआरची कॉपी देखील मागितली आहे. आरोपींना शोधून त्यांना अटक करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. जर या प्रकरणी अटक झाली नाही तर महिलांच्या हक्कांसाठी लढणारी संस्था पोलिसांकडून या आरोपींना अटक करण्यासाठी कोणती पावले उचलली याबाबतची माहिती मागू शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.