MS Dhoni : "माझ्या प्रिय थाला, जेव्हा तू..." CSK-GT सामन्यापूर्वी आयपीएल, सीएसके धोनीसाठी भावुक

MS Dhoni news
MS Dhoni news
Updated on

IPL 2023 Tribute For MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जने 10व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यावेळी संघ पाचवी ट्रॉफी जिंकेल अशी आशा चेन्नईच्या चाहत्यांना आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत चार विजेतेपद पटकावले आहेत. तर महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2023 च्या विजेतेपदाच्या सामन्याद्वारे त्याचा 250 वा आयपीएल सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएलने आणि सीएसकेने एमएस धोनीला सन्मान दिला.

धोनीचा हा शेवटचा आयपीएल असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सीएसकेने धोनीचे आभार मानले आहेत. माझ्या प्रिय थाला, प्रत्येक वेळी जेव्हा तू मैदानात पाऊल ठेवले तेव्हा तू आम्हाला फुलपाखरे दिलीत, असे सिएसकेने म्हटले आहे. धोनीने अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली. व त्यांच्या खेळात सुधारणा केली, असा त्याचा अर्थ होतो. यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये त्याच्याविषयी आदर वाढत आहे.

आयपीएलने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये पिच क्युरेटरपासून सुरक्षा रक्षकापर्यंत सर्वजण धोनीबद्दल बोलत होते. व्हिडिओमध्ये धोनीचे अनेक चाहते दिसले. त्यात एक छोटा फॅनही दिसला. प्रत्येकाने धोनीबद्दल बोलले आणि धोनीशी संबंधित आपल्या आठवणी शेअर केल्या. महेंद्रसिंह धोनी हा आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जसाठी नेहमीच आधारस्तंभ राहिला आहे.

MS Dhoni news
New Parliament Building : 'भारताच्या कन्या वेदनेत, कसं म्हणायचं लोकशाहीची जननी?'

धोनी शेवटचा सीझन खेळतोय का?

या मोसमाच्या सुरुवातीपासूनच महेंद्रसिंह धोनीच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चा वाढत आहेत. धोनी पुढील सीझन खेळणार की नाही हे अधिकृतपणे कोणालाच माहीत नाही. टूर्नामेंट दरम्यान एका सामन्यानंतर याबद्दल बोलताना धोनी म्हणाला की त्याला निर्णय घेण्यासाठी ८-९ महिने लागतील.

फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनाही धोनी पुढील हंगामात खेळेल अशी अपेक्षा आहे. धोनी पुढच्या हंगामात खेळेल की नाही हे कासी विश्वनाथ यांनाही माहिती नाही. आता या मोसमानंतर धोनी काय निर्णय घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

MS Dhoni news
IPL Final GT vs CSK Playing 11 : पाचव्या विजेतेपदावर नजर, हार्दिकविरूद्ध धोनी वापरणार 'हा' हुकमी एक्का

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.