IPL 2023 Points Table: लखनौचा विजय अन् चेन्नई-गुजरातला दणका! जाणून घ्या पॉइंट्स टेबल

IPL 2023 Points Table
IPL 2023 Points Table
Updated on

IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना अनेक अर्थांनी खास होता. लखनौने आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या केली. एकाच डावात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम केला. लखनौच्या विजयाचाही पॉइंट टेबलवर मोठा प्रभाव पडला. आता टॉप-4 संघांचे गुणतालिकेत 10-10 गुण आहेत. पण, राजस्थान रॉयल्सची नंबर वन खुर्ची अबाधित राहिली.

IPL 2023 Points Table
IPL 2023 : लखनौला धक्का! पंजाबचा बँड वाजवणारा मॅच विनर दिग्गज खेळाडू जखमी, पुढील सामन्यातून बाहेर?

लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्जवर 56 धावांनी विजय मिळवून त्याचा मोठा फायदा झाला. 5 विजयांसह संघाचे 10 गुण झाले आणि निव्वळ धावगती देखील सुधारली आणि लखनौच्या संघाने गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. गुजरात टायटन्सला तिसऱ्या स्थानावर घसरावे लागले आणि शेवटचा सामना गमावलेल्या चेन्नई सुपर किंग्स चौथ्या स्थानी आली. म्हणजेच लखनौच्या विजयाचा परिणाम चेन्नईपासून गुजरातपर्यंत जाणवला.

IPL 2023 Points Table
''मी निर्दोष, न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास...'', FIR दाखल केल्यानंतर ब्रिजभूषण यांची प्रतिक्रिया

राजस्थान रॉयल्स अजूनही 8 सामन्यांत 10 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. आता लखनौ 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी 10-10 गुण असूनही गुजरात टायटन्स तिसऱ्या आणि चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे पंजाब किंग्ज अजूनही ८ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. मात्र त्याच्या धावगतीचा फटका बसला आहे.

आता सर्वांच्या नजरा शनिवारी होणाऱ्या दोन सामन्यांकडे लागल्या आहेत. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असतील. गुजरातला नंबर-1 होण्याची संधी आहे. दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. दोघांचे सध्या 4-4 गुण आहेत आणि हे दोन्ही संघ शेवटच्या 2 स्थानावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.