Virat Kohli Fined: विराट कोहलीवर BCCIची मोठी कारवाई! एक चूक अजून झाली तर घातल्या जाणार बंदी

राजस्थानविरुद्ध आरसीबीची मोठी चूक! बीसीसीआयने केली कडक शिक्षा
Virat Kohli Fined
Virat Kohli Fined
Updated on

IPL 2023 Virat Kohli Fined : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कार्यवाहक कर्णधार विराट कोहलीने सलग दोन सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने आयपीएलमध्ये 18 महिन्यांनंतर पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले.

मात्र, दरम्यान कोहलीसाठी एक वाईट बातमी आली आहे. रविवारी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात षटकाचा वेग कमी ठेवल्याबद्दल विराटला दंड ठोठावण्यात आला आहे.

Virat Kohli Fined
IPL 2023 : कर्णधार रोहित शर्माला चिंता गोलंदाजांची! गुजरात टायटन्सविरुद्ध अर्जुन तेंडुलकर बाहेर?

यावेळी हा दंड केवळ संघाच्या कर्णधारालाच नाही तर संपूर्ण संघाला लावण्यात आला आहे. कोहलीला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर आरसीबीच्या इतर खेळाडूंनाही शिक्षा झाली आहे. त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के कपात करण्यात आली आहे.

आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरसीबी संघ राजस्थानविरुद्ध वेळेवर पूर्ण षटके टाकू शकला नाही. संघाने हंगामात दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. (Latest Marathi News)

Virat Kohli Fined
CSK IPL 2023 : कोटींची किंमत मिळालेल्या खेळाडूंनाही वरचढ ठरला 20 लाखांचा खेळाडू, धोनीचाही जिंकलाय विश्वास

विराटवर 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि इम्पॅक्ट प्लेयरसह प्लेइंग-11 च्या इतर खेळाडूंना प्रत्येकी 6 लाख रुपये किंवा सामन्याच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसला दंड ठोठावण्यात आला होता. (Latest Sport News)

संघाच्या दुसऱ्या चुकीमुळे यावेळी मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. आता संघाने पुन्हा एकदा ही चूक केली तर कर्णधारावर एक किंवा अधिक सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते. अशा परिस्थितीत विराटने आगामी सामन्यात कर्णधारपद भूषवल्यास त्याला काळजी घ्यावी लागेल, अन्यथा त्याला मोठी शिक्षा होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()